के. जे. सोमैया महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी दि.१६ : “कोरोना संकटाच्या काळात आपल्या जगण्यावर आणि खास करून संचारावर मर्यादा आल्याने “वाचन प्रेरणा दिन” अनोख्या पधदतीने साजरा करत आहोत, ही नक्कीच आनंदाची बाब आहे. यंदा आपण महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थयाने १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत किमान एक पुस्तक वाचावे आणि वाचलेल्या पुस्तकाची समीक्षा ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आली व त्याचे संकलन देखील तयार होणार आहे. या सर्व बाबी कोरोना संकट काळात देखील नक्कीच प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्रीनिवास डागा यांनी येथे केले आहे.

डागा हे के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ट महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी को. ता. एज्यु. सोसायटी चे सचिव विधिज्ञ संजीव कुलकर्णी होते. या प्रसंगी डॉ. A.P.J अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्रीनिवास डागा यांनी ग्रंथालयास रु. १३,०००/- किमतीचे ग्रंथ भेट दिले. त्यांचा महाविदयालय, संस्था व ग्रंथालयाच्या  वतीने विशेष सन्मान करण्यात आला. संजीव कुलकर्णी यांनी याप्रसंगी महाविद्यालय व ग्रंथालयाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करताना श्रीनिवास डागा यांचे ही विशेष कौतुक केले.

यावेळी मा. प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांची विशेष उपस्थिती  होती.या  प्रसंगी त्यांनी वाचनाचे महत्त्व  पटवून  दिले.  सोशल डिस्टंसिंगचे पालन करून साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन ग्रंथपाल नीता शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. येथे अनोख्या उपक्रमास कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व  सचिव संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीप रोहमारे यांनी शुभेच्छा दिल्या.

 11 

Total Visits: 124954

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *