पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कळस शाळेचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

अकोले प्रतिनिधी, दि. १० : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प. प्राथमिक केंद्र शाळा कळस बु ला चांगले यश मिळाले आहे. या शाळेचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहे. मुख्याध्यापक एकनाथ दिघे यांनी ही माहिती दिली. यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे जि. प. सदस्य कैलासराव वाकचौरे यांनी अभिनंदन केले आहे.

कळसच्या शाळेतील इ.५वी च्या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेस ४४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यात अमान इकबाल सय्यद, आदिती भानुदास चौधरी यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना श्रीमती बबुताई शिंगोटे व संपत भोर यांचे मार्गदर्शन लाभले.

या गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांचा गौरव सोहळा शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. कार्यक्रम अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे गुरुजी होते.  यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रिपाइचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, शा.व्य. समिती अध्यक्ष ईश्वर वाकचौरे, उपाध्यक्ष सरिता सचिन भुसारी, भरत वाकचौरे गुरुजी, समिती सदस्य नामदेव निसाळ, प्रकाश बिबवे ,रामदास वाकचौरे, पालक इक्बाल सय्यद, तलाठी भानुदास चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी धनवटे, संगीता दिघे, मुठे अनाजी, गुरव स्वप्ना, जाधव सुवर्णा, गोरे माधवी , लोंढे चैताली, भागवत कर्पे सर्व शिक्षक उपस्थित होते.  नंदा कातोरे यांनी सुत्रसंचालन केले. आभार संजय शिंदे यांनी मानले. 

 635 

Total Visits: 124984

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *