मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालयाचे माईंचे स्वप्न पूर्ण झाले – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी दि. १९ : कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्याकडे सौ. सुशिलामाई काळे यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरु करण्याचा आग्रह धरला होता. मुलांप्रमाणे मुलींसाठी देखील वेगळ व्यासपीठ असावं, त्या शाळेच्या माध्यमातून मुलींना आपल्या कला, गुणांना वाव मिळावा. मुलींनी शिकून मोठ व्हावं नोकरी व्यवसाय करावा अशी माईंची इच्छा होती. माईंनी कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्याकडे केलेल्या आग्रहातूनच मुलींसाठी स्वतंत्र शाळा महाविद्यालय सुरु होवून मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालयाचे माईंचे स्वप्न पूर्ण झाले असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.  

कोळपेवाडी–सुरेगाव येथील रयत संकुलाच्या राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या २० व्या स्मृतीदिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे ऑनलाईन उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे हे २० वे वर्ष होते.

यावेळी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, वक्तृत्व हे एक शास्त्र असून ती एक कला देखील आहे. वक्ता हा अभ्यासू तसेच वाणी आणि विचारांची योग्य सांगड घालत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा असावा आपल्याकडील उदंड ज्ञान वक्तृत्वाच्या माध्यमातून आपण इतरांपर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो त्यासाठी आपल्याकडे वक्तृत्व कला आत्मसात करून उत्तम वक्ता होणे गरजेचे असून अशा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यातील उत्तम वक्ते घडतील असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमात एन.एम.एस.इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनींचा आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे यांनी सुरेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने चार इंफ्राग्रेड थर्मामीटर व चार ऑक्सिमीटर महाविद्यालयास भेट दिले.

       कार्यक्रमाचे प्रास्तविक स्पर्धेचे पर्यवेक्षक सचिव रमेश मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रोहिणी म्हस्के तर आभार मधुकर गोडे यांनी मानले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, संभाजीराव काळे, कचरू कोळपे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. छाया काकडे, राहुल चांदगुडे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्र. प्राचार्य रामकृष्ण दिघे, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, प्रा.अंगद काकडे, प्रभाकर आभाळे, सुरेश खंडीझोड तसेच पंचक्रोशीतील विविध शाखेतील परीक्षक व रयत संकुलातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सोशल डिस्टन्सिंग ठेवून उपस्थित होते.  

 357 

Total Visits: 125080

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *