बिगरमोसमी पावसाने सकाळपासून दुपारपर्यंत हजेरी

अकोले प्रतिनिधी, दि. ८: बिगरमोसमी पावसाने काल सकाळपासून तर दुपारपर्यंत हजेरी लावली. कमी जास्त प्रमाणात या पावसाची हजेरी राहील्याने बळीराजा मध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. या पावसामुळे बळीराजाचा चिंतेत वाढ झाली आहे.

बळीराजावर रब्बी हंगामात निसर्गाचा कोप वाढला आहे. करोनाचे सावट कमी होत असताना अस्मानी संकटाने बळी राजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चार दिवसाच्या ढगाळ वातावरणानतंर, आज पावसाने हजेरी लावली. त्यापूर्वी गेल्या तीन रात्री हलक्या सरी, थेंब थेंब पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होते.

आज सूर्योदयापुर्वीच निसर्गाने कोप केला आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बळिराजाने केलेली कांद्याची लागवड,गहु, हरभरा पेरणी ऐन जोमावर असताना पिकाची लागवड धोक्यात आली आहे. कांद्याचे रोप प्रंचड धुक्यामुळे गारठले आहे. तर हरभरा जाग्यावर थांबला. गव्हाची ओंबी पाण्याने वजनदार झाल्याने जमिनीवर झोपली. तर कांद्याची लागण खोळंबली. द्राक्षे, डाळिंब यांचे भविष्य धूसर बनत चालले आहे.

पावसामुळे उसाची तोड थांबली. तर दुधाळ जनावरे गारठली. त्यामुळे दुधाचा समतोल बिघडला. वारंवार दुष्काळाचा, अतिवृष्टीचा आणि अस्मानी संकटाचा बळीराजावर आघात झाल्याने या अवकाळी पावसाने बळीराजा आता पुरता हवालदिल झाला आहे. 
या सर्व प्रसंगात हतातोंडाशी आलेला घास आज या अवकाळी पावसाने हिरावून नेलेला आहे. या प्रसंगात आता शेतकरी राजाने परत कंबर कसण्याची गरज कळस बु सोसायटीचे चेअरमन विनय वाकचौरे व संचालक ज्ञानदेव वाकचौरे यांनी बोलून दाखवली.

 95 

Total Visits: 125089

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *