अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेच्या मुख्य विश्वस्त पदी पद्माकांत कुदळे

कोपरगाव प्रतिनिधी दि.१ : माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांची अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेच्या मुख्य विश्वस्त पदी एकमुखी निवड करण्यात आली. गुरूवारी  सेंट्रल पार्क पुणे येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात  विश्वस्त मंडळाची बैठक  संपन्न झाली.

या बैठकीत मुख्य विश्वस्त म्हणून असलेले विश्वनाथ भालिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या मुख्य विश्वस्त पदावर कोपरगावचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांची एकमुखी निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप राऊत, सरचिटणीस प्रशांत एकतपुरे, विश्वस्त निलीमा सोनवणे (नाशिक), प्रकाश लोंढे, रवि चौधरी(पुणे), प्रा. संपतराव शिंदे (फलटण), एम.बी. महाजन (जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती.

अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे कार्य राज्यासह देश-विदेशात सुरु असुन संस्थेचे १४ हजारा पेक्षा अधिक सभासद आहेत.  संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजीक उपक्रम राबवून ४ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या संस्थेचे सामाजिक कार्य अधिक उंचीवर पोहचवून त्याचा लाभ समाजातील वंचित घटकांना व्हावा यासाठी संस्थेत गेल्या १२ वर्षापासून विश्वस्त म्हणुन पद्माकांत कुदळे यांनी उत्कृष्ठ कार्य केले आहेत.

कोपरगाव नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन,समता परिषद, रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक समिती सदस्य व   रयतच्या शाळा,महाविद्यालयात विविध पदावर  राहुन सामाजीक, राजकीय व शैक्षणिक कार्य केले आहेत. त्यांच्या कार्याचा व अनुभवाचा फायदा मुख्य विश्वस्त म्हणून संस्थेला होणार असुन संस्थेचे कार्य अधिक गतीमान व हितकारक होईल अशी भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी  व्यक्त केली. 

दरम्यान तज्ञ विश्वस्त प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ यांनी संस्थेचे मावळते मुख्य विश्वस्त विश्वनाथ भालिंगे यांचा सन्मान केला. तर प्रा.एम.एम.फुले यांनी नुतन मुख्य विश्वस्त पद्माकांत कुदळे यांचा सन्मान करून निवडी बद्दल अभिनंदन केले. पद्माकांत कुदळे यांची मुख्य विश्वस्त पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्थरातुन अभिनंदन  होत आहे. 

 3,124 

Total Visits: 125071

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *