अवैद्य धंद्या विरोधात लढा चालूच ठेवणार – औताडे

कोपरगाव प्रातिनिधी दि. २५ : पंचवीस वर्षापूर्वी पोहेगाव मध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्या विरोधात लढा उभारला दारू मटका जुगार अदी अवैध धंदे बंद झाले. त्यामुळेच आज पोहेगांवची फुललेली बाजार पेठ नगर जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. पंचवीस वर्ष सुरू असलेला लढ्याला राजकीय रंग देऊन काही लोकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. चोर तो चोर वर शिरजोर असा आव आणत काहीनी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

अनेक महिला व व्यापारी वर्गाच्या तक्रारी आल्यानंतर पुन्हा एकदा अवैद्य धंद्या विरोधात आवाज उठवला. अवैध धंदे करणारांनी सरपंच अमोल औताडे व औताडे फॅमिलीला टारगेट केले. चुकीच्या पद्धतीने पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करत बदनामी करण्याचे षड्यंत्र कोणाचे आहे ते आता नागरीकांना कळाले आहे. अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालत आहे याचा उलगडा झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना मदत करणे गरजेचे होते. शेवटी काय खरे आणि काय खोटे हे जनतेपुढे येईलच.

अवैद्य धंदे विरोधात पंचवीस वर्ष लढाई केली अजूनही जर कोणी अवैध धंदे करणाऱ्यांनाच खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर या अवैध धंदे विरोधात जीवात जीव असेपर्यंत लढा कायम ठेवला जाईल. पोहेगावची जनता यात सहभागी असेल अशी प्रतिक्रिया पोहेगावचे माजी सरपंच शिवसेनेचे नेते नितीनराव औताडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

दारूबंदीच्या वादातून नानासाहेब माधव औताडे यांनी सरपंच अमोल औताडे यांना भर मिंटीगमध्ये जीवे मारण्याची धमकी दिली होती. ऋतिक औताडे हे आपल्या ऑफिस मध्ये जात असताना किरण औताडे यांनी त्यांना मोटरसायकल आडवी लावत शिवीगाळ केली. कारण दारूबंदीचे मात्र राजकीय मंडळींनी त्याला खतपाणी घातले.

आमच्या विरोधात शिर्डी पोलिस स्टेशनला खोटी फिर्याद दाखल केली. खोटी फिर्याद दाखल केल्याने गावात संवेदनशील वातावरण तयार झाले. पोलिसांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये व गावात शांतता रहावी म्हणून आम्ही पोलिसांना मदत केली. आम्हाला यात गोवण्यासाठी उच्च पातळीवरून काहींनी प्रयत्न केले रसदही पुरवली मात्र त्यांचे मनसुबे पूर्ण झाले नाही. मग मात्र बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

अनेक वृत्तपत्रांच्या संपादकानाही फोन झाले. मात्र त्यांनी खरी बाजू पडताळून पाहिली. मात्र तालुक्याला माहित असलेल्या व अनेक वृतपत्रातून हद्दपार केलेल्या एका महाशयांने आमच्या विरोधात पोर्टलला खोटा मजकूर छापला. त्याने त्यात या अवैध धंद्यांना कोण खतपाणी घालतात व कोणाच्या सांगण्यावरून फिर्याद दाखल केली तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी कोणा कोणा प्रयत्न केले त्याचाही उल्लेख करून जनतेला या मागचा सूत्रधार कोण हे दाखवून दिले.

त्या बदनामी करणाऱ्या पत्रकारा विरोधातही आधीच आमचे खटले चालू आहे यात नवीन अब्रूनुकसानीचा खटला आम्ही भरणार आहोत. अवैद्य धंदे करणारांना कोणी कितीही साथ द्या कितीही पैसे पुरवा मात्र आम्ही पोहेगावच्या जनतेला बरोबर घेऊन अवैध धंदेवाल्या विरोधात लढा कायम ठेवणार. शिर्डी पोलीस स्टेशन यात आमची मदत करेल असेही औताडे यांनी शेवटी स्पष्ट केले.

 163 

Total Visits: 125113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *