
(अणदूर-तुळजापूर) प्रतिनिधी, लक्ष्मण दुपारगुडे दि. १३: तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका विवाहीतेला विविध अमिष दाखवुन दमदाटी करीत दोन वर्षापासून लैगिंक आत्याचार करुन पिडीतेचे कौटुंबिक आयुष्य उध्वस्त करून मारहान करणारा आलताफ लालडू ईनामदार याच्या विरोधात पिडीत महीलेने तक्रार दिल्याने आलताफ ईनामदार या नराधमाला नळदुर्ग पोलीसांनी गजाआड केले आहे.
या घटने बाबत पोलीसाकडून मिळालेली माहीती अशी की, सासरच्या त्रासालाने माहेरी आलेली विवाहीता ही आपल्या आई समवेत राहुन अणदुर येथे मोलमजुरी करुन उपजिविका करीत होती.

विवाहीतेच्या असाह्यतेचा गैरफायदा घेत अलताफ ईनामदार याने सुरवातीस गोड बोलुन प्रेमाच्या जाळ्यात फसवले नंतर शारीरिक संबध वाढवून लग्नाचे अमिष दाखवत सतत दोन वर्ष त्या महिलेला दमदाटी करून लैगिंक आत्याचार केला.

लग्नास टाळाटाळ करीत असल्याचे पिडीतेच्या लक्षात येताच तीने त्याला लग्न करण्याचा तगादा लावला. मात्र तो सोयीस्कर टाळू लागला प्रसंगी मारहान करून दमदाटी करीत वारंवार आत्याचार करीत असल्याने अखेर पिडीत महीलेने शुक्रवारी नळदुर्ग पोलीस स्टेनश गाठुन आलताफ ईनामदार या विरोधात लैगिंक आत्याचाराची तक्रार दिली.

पिडीत महीलेच्या तक्रारी वरुन पोलीसांनी ईनामदार याला गजाआड केले आहे. अलताफ लालडू इनामदार याच्या विरोधात व नळदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये भा. द. वि. ३७६(२), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लहाने करीत आहेत.


2,661