श्रेयवादातून आमदारांनी नागरिकांना नाटयगृहापासून वंचित ठेवले – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी दि. २५ : नाट्य, कला, संस्कृती माहेर घर असलेल्या कोपरगावला बंदीस्त भव्य नाट्यगृह असावे यासाठी २ कोटीचा निधी मी आमदार असताना आणला मात्र केवळ त्याला मोकळी जागा करारावर घेवून बांधकाम सुरु करायचे होते परंतू श्रेयवादामुळे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी नाट्यगृहाला जागा उपलब्ध करुन ई नाही.

त्यामुळे आलेला दोन कोटी निधी पालीकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी संगणमताने पालीकेच्या कार्यालयाच्या कामाला वळवून कोपरगावच्या नाट्य कलावंत व नाट्यप्रेमींना वंचित ठेवण्याचे काम केले अशी खंत माजी आमदार व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

त्या पत्रकात पुढे म्हणाल्या की, नाटय रसिकांच्या आग्रहाखातर आधुनिक बंदिस्त नाटयगृह व्हावे म्हणून राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री तथा  माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे मी आमदार असताना पाठपुरावा करून बंदिस्त नाटयगृहासाठी निधी व जागा मिळावी म्हणून मागणी केली होती. त्यानुसार नाटयगृहासाठी २ कोटी रूपयांचा मिळवून दिले. तसेच पाटबंधारे विभागाची सुमारे एक एकर जागाही दिली उपलब्ध केली.

केवळ जागेची काही तांत्रिक बाबी पुर्ण करणे बाकी होते ते विद्यमान आमदार काळे यांनी पुर्ण करणे आवश्यक होते. मात्र आमदार काळे मतदार संघाचा विकास करीत असल्याच्या फक्त वल्गना करण्यात आणि मी केलेल्या विकासकामाच्या पाट्या लावण्यात मशगुल आहेत. विद्यमान आमदारांनी हा नाटयगृृहाचा निधी दुसरीकडे वळवून कोपरगावकरांना नाटयगृहापासून वंचित ठेवले आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी आलेला निधी अन्यत्र वळविण्याचे काम झाले आहे.

 पालीकेच्या ईमारतीसाठी आमदार काळे यांनी स्वतंत्र वाढीव निधी उपलब्ध करण्या ऐवजी नाट्यगृहाचा आलेला निधी पळूवून इमारतीचे थकीत बिले काढण्यास व स्वहीत साधणाऱ्यांना पाठबळ देवून भ्रष्टाचार करणाऱ्यांना खतपाणी घातले असल्याचा आरोप  स्नेहलता कोल्हे यांनी आमदार काळे, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

जागेचा ताबा घेउन नाटयगृहाचे काम सुरू करण्याऐवजी विद्यमान लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकांरी यांनी संगनमत करून बिले काढण्यासाठीच सदरचा निधी दुसरीकडे पळविला आहे. ही कोपरगावकरांच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. अहमदनगर जिल्हयातील मोठी नगरपरिषद असलेल्या कोपरगाव शहरातील कलात्मक व सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी आधुनिक नाटयगृह उभारणीच्या दृष्टीने सुमारे ८कोटी रूपयाचा निधी मिळावा म्हणून दि. २० मार्च २०१५ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री  देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी केली होती.

त्यानुसार वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांक नपावै-२०१७/प्र.क्र.१७२/९८/नवि-१६. दि.२० नोव्हेंबर २०१७ अन्वये सन २०१७-१८ करीता २ कोटी रूपयाचा निधी कोपरगाव नगरपरिषदेला मिळाला. इरिगेशन बंगल्याजवळील पाटबंधारे विभागाची जागाही या नाटयगृहासाठी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार कोपरगाव शहरात आधुनिक नाटयगृहास जलसंपदा विभागाच्या मालकीची स.नं.१९३५ व १९३९ मधील जागेपैकी एक एकर जागा महामंडळाच्या नियामक मंडळाच्या विपय क्र.६५/२,ठराव क्र.६५/१८ अन्वये नाटयगृह बांधण्याकरीता हस्तांतरीत करणे व करारनामा करून घेणेबाबत उपविभागीय अभियंता,गोदावरी डावा तट कालवा, उपविभाग, कोपरगाव यांनी कोपरगाव नगरपरिषदेस कळविले होते.

वास्तविक अथक परिश्रम करून आपण बंदिस्त नाटयगृहासाठी निधी मंजुर करून आणला, तसेच जागाही उपलब्ध करून दिली, फक्त जागा ताब्यात घेउन काम सुरू करणे बाकी असतांना सदरचा निधी अन्यत्र वळवून बिले काढण्यासाठीचाच विरोधकांनी हा खटाटोप केला असल्याचे कोल्हे म्हणाल्या. परंतु राजकीय द्वेषापोटी श्रेय मिळू नये म्हणून हे काम प्रलंबित ठेवून त्यासाठीचा मंजूर असलेला निधी वळविण्याचे काम करून कोपरगावच्या नाटयरसिकांचा भ्रमनिराष केला असल्याची खंतही कोल्हे यांनी व्यक्त केली.

 139 

Total Visits: 124998

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *