कोपरगावात १९९ करोना बाधीत, ४२ कैद्यांचा समावेश, तर दोन महीलांचा मृत्यु

कोपरगाव प्रतिनिधी दि. ७: तालुक्यात करोनाचे तांडव सुरु असुन बुधवारी एकाच दिवशी सर्वाधिक विक्रमी १९९ करोना बाधीत रुग्ण आढळले. रॅपिड तपासणीत ८१, खाजगी तपासणीत २४ तर अहमदनगर शाससकीय तपासणीत ९४ व्यक्ती करोना बाधीत आढळे.

ब्राम्हणगाव येथील ७७ वर्षीय व डाऊच येथील ७५ वर्षीय महीलांचा करोनाने बळी घेतला आहे. आत्तापर्यंत ६६ बाधीतांचा करोनाने बळी घेतला आहे.

दरम्यान कोपरगाव शहरातील दुय्यम करागृहातील बंदीस्त कैद्यांना करोनाची लागण झाल्याने ७० कैद्या पैकी तब्बल दोन दिवसात

४२ कैदी, तर ५ पोलिस सुरक्षारक्षक बाधीत आढळल्याने जेल प्रशासनाची झोप उडाली आहे. अतीश मोठ्या गंभिर गुन्ह्यातील हे कैदी असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यापासुन त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर आहे.

करोना बाधीत झालेले कैदी आनंदी झाले तर प्रशासन चिंतेत आहे. अनेक दिवसापासून एका खोलीत कोंडून राहणारे करोनामुळे उपचारासाठी बाहेर निघणार. मोकळी हवा, नातेवाईक यांच्याशी संपर्क होणार म्हणून आनंदी झाले तर इतक्या मोठ्या गुन्हेगार पळून जाण्याची शक्यता असल्याने सध्या त्यांच्यावर कारागृहात उपचाराची व्यवस्था केली आहे.

जे बाधीत नाहीत असे १९ कैदी नाशिकच्या मध्यवर्ती करागृहात आज वर्ग केल्याची माहीती कोपरगाव दुय्यम करागृहाचे अधिक्षक शंकर दुशिंग यांनी दिली.

दरम्यान तालुक्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने स्थानिक प्रशासन करोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे.

कोपरगाव तालुक्यात करोना बळींची मालीका सुरु झाली आहे.

 100 

Total Visits: 125029

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *