ज्योती सहकारी पतसंस्थेची ३६४ कोटींची उलाढाल – विधीज्ञ रवीकाका बोरावके

कोपरगाव प्रतिनिधी दि.७ : कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी विश्वासपुर्ण व्यवहाराला पात्र असलेली व जनमाणसांच्या संकटात मदत करणारी लोकप्रिय पतसंस्था म्हणून ज्योती नागरी सहरी पतसंस्था आहे. या संस्थेचा वर्षीक लेखाजोखा विक्रमी आहे.

नुकत्याच झालेल्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला २ कोटी ४० लाखाचा नफा झाला आहे. संस्थेच्या एकत्रित व्यवसाय ३६४ कोटी इतका झाला असून यामध्ये २२३ कोटी रुपयांची ठेवी तर १४२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केली आहे. संस्थेची एकूण गुंतवणूक ९६ कोटी रुपये इतकी आहे.

करोनाच्या या काळात सुद्धा संस्थेने आपले कामकाज अखंडपणे चालू ठेवत ग्राहकांना व खातेदारांना नियोजनबद्ध नम्रपणे जलद सेवा देवून विक्रमी उलाढाल केली आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन विधीज्ञ रवीकाका बोरावके यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, ज्योती पतसंस्थेवर सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने संस्थेच्या भांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरीक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके संस्थेने पूर्ण करून सन २०१९- २० या मागील आर्थिक वर्षासाठी शासकीय लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला आहे. सन २०२०-२१ या आर्थीक वर्षामध्ये मध्ये करोनाचा मोठा परिणाम संपूर्ण बाजारपेठेसह आर्थीक उलाढालीवर झालेला असताना देखील संस्थेने आवश्यक ती प्रमाणके पूर्ण करून ठेवीत कर्जे, भाग भांडवल व गुंतवणूक या सर्वांमध्ये आर्थीक वाढ करून मागील वर्षाच्या तुलनेत एन पी ए चे प्रमाण कमी करण्यात ज्योती पतसंस्थेला यश आले आहे.

सामान्य नागरिक व इतर संस्थांसाठी ठेवीच्या व कर्जा करिता कमीत कमी व्याजदराने कर्ज वितरित केलेले. त्याला खातेदारांनी उत्तम प्रतिसाद दिला. नव्या वर्षात छोट्या-मोठ्या उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरु करीत असल्याचे चेअरमन बोरावके यांनी सांगितले. कर्जवसुलीसाठी कर्जदारा बरोबर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावा लागला त्यामुळे कर्ज वसुली चांगली झाली.

यापुढेही योग्य सुविधासह वसुली मध्ये सातत्य राखुन ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. मागील आर्थिक वर्षात करोना संकटात सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांसाठी सुमारे तीस ते पस्तीस हजार ‘आर्सेनिक अल्बम ३०’या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या गोळ्यांचे वाटप तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने केले होते. करोना मुक्त करण्यासाठी संस्थेने अनेक जनहिताचे उपक्रम राबवून जनहीत पाहीले.

संस्थेने नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेतलेला आहे. संस्थेच्या या प्रगतीत सभासद, ठेवीदार, खातेदार व ज्योती मंगल ठेव प्रतिनिधी संस्थेचे सर्व संचालक, शाखा अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. सर्वांच्या अनमोल योगदानामुळे हे यश संपादन करण्यात संस्था यशस्वी होत आहे. ज्योती पतसंस्थेच्या कार्यात योगदान दिलेल्या सर्वांचे चेअरमन बोरावके यांनी अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.

 59 

Total Visits: 124988

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *