पाण्यासाठी राजकारणाला फाटा देवून कार्य केले पाहीजे – राजेंद्र झावरे

कोपरगाव प्रतिनिधी दि.७ : कोपरगाव शहराची पाणी समस्या अतिशय बिकट झाली आहे. नागरीकांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्न असल्याने आता पाण्यावरून कोणीही श्रेयवाद घालु नये. वर्षानुवर्षे पाण्याचे राजकारण करुन शहराची दुर्दशा झाली आता. राजकारणाला फाटा देवून पिण्याच्या पाण्या प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. पाणी कुठूनही आले तरी चालेल. अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, मी जेव्हा जनतेतून कोपरगाव नगरपालीकेचा नगराध्यक्ष झालो तेव्हा मला दोन्ही बढ्या नेत्यांचा राजकीय विरोध होता. मात्र विकासाच्या कामासाठी मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढल्यामुळे विकास कार्य करता आले. शहराच्या पाणी प्रश्न माझ्या काळात कठीन झाला होता.

पाटबंधारे विभागाने वाढीव पाणी पट्टी आकारली होती मात्र पाणी पट्टी कमी करून घेण्यासाठी मी अनेकवेळा मंत्रालय व संबधीत विभागाच्या कार्यालयात चकरा मारल्या. त्यावेळचे आमदार माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची अनेकवेळा मदत घेतली. त्यावेळेसचे विधानपरिषदेचे सभापती ना.स. फरांदे यांची भेट घेवून पाटबंधारे विभागाकडून पालीकेला येणारी वाढीव पाणी कमी करून घेवून वाणिज्य नळ जोड व त्याचे वेगळे दर करून घेतले आणि कोट्यावधी रूपयाची थकीत त पाणी पट्टी कमी करून घेतल्याने पालीकेचे पैसे वाचवले.

या कामात माजी खासदार शंकरराव काळे यांनीही मोलाचे सहकार्य केले. मी काळे – कोल्हे यांचा कट्टर विरोधी नगराध्यक्ष असतानाही विकासाच्या कामात कायदेशिर मार्ग काढून शहरात विकासाचे कामे केले त्यात नव्या साठवण तलावांचा वाढी प्रस्ताव तयार केला होता. पण दुर्दैवाने त्या तलावाचे काम माहीतीच्या अधिकाराचा वापर करुन बंद पाडले या बद्दल झावरे यांनी खंत व्यक्त केली.

कोपरगाव शहराला मुबलक स्वच्छ पाणी मिळावे म्हणून तत्कालीन जलसंपदा मंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संजीवनी कार्यस्थळावर जावून प्रत्यक्ष भेट घेतली आणि निळवंडेचे पाणी कोपरगावला मिळावे अशी मागणी त्यावेळी केली होती. अशी आठवण झावरे यानी सांगत शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मी विविध पातळीवर प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यानंतर गटातटाच्या राजकारणात पाण्यावरून फक्त राजकारण सुरू झाले.

पाण्यावरून अनेक निवडणूका गाजल्या पण आजूनही शाश्वत पाणी येत नसल्याची खंत व्यक्त केली. पाठबंधारे विभागा बरोबर मी केलेल्या करारा नंतर पुन्हा कोणीही नवीन करार न केल्याने पालीकेचे कोट्यावधी रूपये पाण्यात जात आहेत. विद्यमान नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा कायदेशीर वापर करुन पाण्याच्या समस्या सोडवाव्या. मनात विकास करायची इच्छा असेल तर कोणी कितीही विरोध केला तरी जनतेच्या बळावर अशक्य काम शक्य होते हा माझा अनुभव आहे.

शहराला पाणी कसेही आणि कुठूनही आले तरी चालेल पण दररोज आले पाहीजे. गेल्या १० वर्षापासून ४२ कोटीची पाणी पुरवठा योजना मातीत गाडली आहे. ज्यांनी ही योजना आणली आहे त्यांनी तरी त्वरीत चालु करावे. पाणी आणायचा तपास नाही, पण पाणी येण्या आगोदरच विरोध होतो. चांगल्या कामात खोडा घालण्याची सवय अनेकांना लागली आहे. त्यात आता सामाजिक कार्यकर्त्यांची भर पडल्याने होणारे काम होत नाही. अनेकजन भितीपोटी विकास कामे करण्यास पुढे येत नाहीत. कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात आडकण्यापेक्षा काम न केलेले बरे असे ठेकेदार बोलत आहेत.

भ्रष्टाचार कमी करण्याचा त्यांचा प्रमाणीक हेतू असेलही पण संपुर्ण यंत्रणेला किड लागल्याने होणारे कामे होत नाहीत म्हणूनच पालीकेच्या चौथ्या साठवण तलावाचे काम आडकले आहे. यापुढे एकतर जे काम करायचे आहे त्याची सखोल माहीती काम सुरु होण्यापुर्वी घ्यावी अन्यथा काम पूर्ण झाल्यानंतर घ्यावी पण मध्येच काम बंद करुन जनतेचे नुकसान कोणी करु नये.

त्यामुळेच कोपरगाव शहरातील नागरीकिंच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गतीमान निर्णय आवश्यक आहे. अन्यथा पाणी नसलेले गाव म्हणजे कोपरगाव अशी ओळख होईल.

 392 

Total Visits: 125112

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *