जि. प. अध्यक्षा घुलेंमुळे शेवगावला भरीव निधी

१७ गावातील शाळांना ४३ नवीन खोल्या मंजूर

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : जि. प.च्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या ४३५ नवीन वर्ग खोल्यांना मंजुरी देण्यात आली असून पैकी शेवगाव तालुक्यातील १७ गावातील ४३ शाळा खोल्यांना मंजुरी मिळाली आहे.

यात दहिगावने जि. प. गटातील भाविनिमगाव १, सुलतानपुर १, घोटण १, क-हेटाकळी २ , रांजणी ३, शहरटाकळी ४ आणि दहिगावने ११ तसेच भातकुडगाव गटातील अमरापूर १, जोहरापुर ३, ढोरजळगाव- शे ३ , बोधेगाव गटातील पिंगेवाडी १, बोधेगाव ३  तर  लाडजळगाव गटातील ब-हाणपुर १, आधोडी २, खरडगाव ४  अशा ४३ शाळा खोल्यांचा समावेश आहे.

एका वर्ग खोली साठी साडेआठ ते नऊ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  वर्ग खोल्यांना मंजुरी दिल्याबद्दल  सुभाष पवार,  मनिषा काकासाहेब घुले, रुख्मिणी सतिष धोंडे,  आबासाहेब काळे,  सुनंदा शिवाजीराव गवळी,  रोहन लांडे,  रागिणी सुधाकर लांडे,  विजयराव नामदेवराव पोटफोडे, ताराबाई घुगे, मंगल आण्णासाहेब जाधव, सुभाष शातवंन पवळे, शफीक सय्यद,  सुभाष सुखदेव वाणी आदि पदाधिकार्यांनी घुले यांचे आभार  मानले.

 129 

Total Visits: 125115

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *