
शेवगाव प्रतिनीधी, दि. ८: येथील ग्रामिण रूग्णालयात सुरू असलेल्या शासकिय कोव्हिड केअर सेंटरच्या मदतीसाठी उद्योजक सुधीर सबलोक यांनी पन्नास हजार रूपये मदतीचा धनादेश दिला आहे.

बोधेगाव रस्त्यावरील ग्रामिण रूग्णालयात शेवगाव रोटरी क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तहसिलदार अर्चना पागिरे, ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रामेश्वर काटे, वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपक परदेशी आदींच्या उपस्थित सबलोक यांनी हा धनादेश प्रदान केला.

रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष भागनाथ काटे यांच्या पुढाकारातून सबलोक यांनी ही देणगी दिली. यावेळी रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा, रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सचिव बाळासाहेब चौधरी, माजी अध्यक्ष डॉ. गणेश चेके, डॉ. पुरूषोत्तम बिहाणी आदी उपस्थित होते.




144
Total Visits: 124951