काळे- कोल्हेंनी एकत्र येवून कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवावा – संजय सातभाई

कोपरगाव प्रतिनिधी दि. ८ : शहरातील नागरीकांना आठ दिवसाला पिण्याचे पाणी मिळते. पाण्याअभावी कोपरगाव शहराचा ऱ्हास होत चालला आहे. तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी काळे – कोल्हे यांनी एकत्र यावे. कोपरगाव शहराला दररोज स्वच्छ व मुबलक पाण्या देण्याची क्षमता या दोन्ही नेत्यामध्ये आहे. पाणी प्रश्नावर काळे-कोल्हे या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रसंगी त्यांचे पाय धरायला मी तयार आहे. किंवा ते म्हणतील त्यांचे पाय धरू पण कोपरगावच्या पाण्याची समस्या कायमची सोडवावी अशी भावनीक साद माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी घातली आहे.

कोपरगावच्या पाण्याची विदारक कहाणी लोकसंवादने मांडल्या नंतर तालुक्यात खळबळ उडाली. आता राजकारणा पलीकडे जावून नागरीक पाण्याच्या समस्येवर आक्रमकपणे बोलत आहेत. आपल्या मनातल्या सत्य भावना व्यक्त करीत आहेत. अशीच भावना संजय सातभाई यांनी व्यक्त केली. कोपरगाव नगरपालीकेच्या राजकारणात तब्बल ४ वेळा नगराध्यक्ष पद मिळवणारे सातभाई कुटुंब  हे एकमेव कुटुंब आहे. सन १९४६ ते १९६६ या काळात कोपरगाव शहरातील नागरीकांना ‘सातभाई वॉटर सप्लाय कंपनी प्रा.लि.’ या कंपनीच्या माध्यमातून  सातभाई यांनी नागरीकांना घरोघरी गोदावरी नदीतून पाणी उचलुन दररोज दोन वेळा पाणी पुरवठा केला.

त्यानंतर सन १९७२ साली  सातभाई यांची ही पाणी पुरवठा यंत्रणा कोपरगाव नगरपालीकेकडे वर्ग करण्यात आली आणि दारणा धरणातून पालीकेच्या माध्यमातून गोड पाणी पुरवठा सुरु झाला. साठवण क्षमता वाढवली. अनेक पाणी पुरवठा योजना सातभाई यांच्या कार्यकाळात आल्या व त्यांचा शुभारंभ केला. मात्र दिवसेंदिवस दारणा व इतर धरणातील पाण्याचा साठा कमी होत गेला. धरणातील पाण्यावर वेगवेगळे आरक्षण वाढत गेले आणि हक्काचे पाणी कमी झाले. आजही धरणातील साठा कमी झाला तर कोपरगावच्या कालव्यांना अनेक महीने पाणी सोडले जात नाही.

जर कोपरगावला येत्या काळात दररोज पाणी नाही मिळाले तर येथील नागरीकांची माणुसकी कमी होईल आणि राक्षसी पणा वाढेल  म्हणजेच खऱ्या अर्थाने दानवाची भूमी कोपरगाव होईल अशी खंत माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई यांनी यक्त केली.

पालीकेने साठवण क्षमता वाढवून तलावांची संख्या वाढवली पण धरणातून वेळेवर पाणीत येत नसल्याने पिण्याचे पाणी आठ दिवसा वरुन २१ दिवसावर करण्याची वेळ येते. तेव्हा शाश्वत पाण्याचा श्रोत गरजेचा आहे. बंद पाईपलाईनने पाणी आल्याशिवाय कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न मिटणार नाही. साठवण तलावांची क्षमता जरुर करावी पण पाण्याचा दुसरा श्रोत वाढवला पाहीजे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा आराखडा मी नगराध्यक्ष असताना तयार केला होता. त्याला प्रशासनाने मंजुरी दिली होती. परंतु नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात बारमाही पाण्याऐवजी आठमाही पाणी धरणातून येत असल्याने तांत्रिक आडचण पुढे करुन हि योजना पाठीमागे पडली.

त्यांतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुढाकार घेवून निळवंडे धरणातून शिर्डीसाठी बंद पाईपलाईनने पाणी येणार होते. तेच पाणी पुढे कोपरगावला आणण्यासाठी  यशस्वी प्रयत्न केला.  पण पुन्हा त्या पाण्याला आडकाठी आली. आता नविन तलावाचे काम पुर्ण करुन पाणी साठा वाढवण्याचा प्रयत्न आमदार आशुतोष काळे करीत आहेत त्यांची संकल्पना चांगली आहे.

मात्र दुष्काळ स्थिती उद्भवली तर  दारणा धरणातील पाणी कमी पडते अशावेळी कोपरगाव शहराला पाण्याचा दुसरा पर्याय नाही. पाण्याअभावी नागरीकांची हाल होते. तेव्हा तालुक्याचे दोन्ही नेते या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राजकारण बाजुला ठेवून एकमताने एकवेळ एक विचाराने एकत्र येवून ठोस निर्णय घ्यावा. राजकारण पत, प्रतिष्ठा, पक्ष, गट-तट बाजुला सारून हे पुण्याचे काम करण्याची क्षमता फक्त या दोन नेत्यामध्ये  आहे, तेव्हा या दोघांनी इतरांचे न ऐकता ठोस निर्णय घ्यावा अशी विनंती संजय सातभाई यांनी केली आहे.

 1,115 

Total Visits: 125072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *