लक्ष्मीबाई लोंढे यांचे निधन

कोपरगांव प्रतिनिधी दि. ८ : कोकमठाण येथिल लक्ष्मीबाई त्रिंबक लोंढे यांचे अल्पशः आजाराने त्यांच्या राहत्या घरी मंगळवार दि. ६ एप्रिल रोजी प्राणज्योत मालवली. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात  2 मुले, 3 मुली, सुना व नातवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांचे पती, उत्कृष्ट  मृदंग वादक कै. त्रिंबक वाजीराव लोंढे यांचे सव्वा महिन्यापुर्वीच निधन झाले होते.

लोंढे कुटूंबिय वडींलाच्या निधनाच्या दुःखातुन सावरण्या अगोदरच आईच्या अचानक जाण्याने पुन्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कै. लक्ष्मीबाई लोंढे यांनी अतिशय खडतर परीस्थितीमध्ये आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून सुसंस्कारीत केले. अतिशय मायाळू स्वभाव असेलेल्या कै. लक्ष्मीर्बाइंच्या अचानक जाण्याने कोकमठाण  पंचक्रोशीत  हळहळ व्यक्त होत आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांचे स्वीय सहायक नानासाहेब लोंढे यांच्या त्या मातोश्री होत.
नितिनदादा कोल्हे, माजी आमदार व भाजचच्या राज्य सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कै. लक्ष्मीबाई यांच्या निधनाबध्दल तिव्र दुःख व्यक्त केले आहे.

 54 

Total Visits: 125000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *