कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : माजी मंञी स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीत आपल्या कार्याचा ठसा उमटवत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसापासून विविध उपपदार्थ बनवणारा संजीवनी कारखाना देशात पहीला उभा केला. आता त्यांच्या पुढच्या पिढीने नवा विक्रम करीत सीएनजी बनवणारा देशातला पहीला सहकारी कारखाना असल्याचा नवा विक्रम युवा नेते विवेक कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून निर्माण केला आहे. कोल्हे साखर कारखान्याच्या नव्या दोन प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी संपन्न होणार असल्याची माहिती विवेक कोल्हे यांनी पञकार परिषद घेवुन दिली.

यावेळी अधिक माहिती देताना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारी साखर कारखाना म्हणजे ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे.सध्या साखर उद्योग अडचणीत आहे. पुर्वी राज्यात २०० सहकारी साखर कारखाने होते आता शंभर पेक्षा कमी राहीले आहेत.

सहकारी साखर कारखान्यांना केंद्रीय सहकार मौञी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम सहकार्य करत मदतीचा हात दिला आहे. सहकार मंञी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली इथेनॉल ग्रेडींगचा प्रोग्राम घेण्यात आला. २ टक्क्यावरुन चालु झालेला प्रोग्राम थेट २० टक्क्या पर्यंत गेला म्हणुन केंद्रीय नेतृत्वाने सहकाराला एक प्रकारे अन्नदात्याला उर्जा करण्याचे काम करून सहकार वाचवला आहे असे विवेक कोल्हे म्हणाले.

अशातच शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी साखर कारखाना ठिकवण्याबरोबर केंद्रीय नेतृत्वाने सहकारी कारखान्यांना दिलेल्या सहकार्यामुळे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने देशातला पहीला सीएनजी प्रकल्प अर्थात काॅम्प्रेस्ड बायो गॅस निर्मीती प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्यूएल प्रकल्प कोपरगाव येथे ५० कोटी रूपये खर्च करुन उभा करण्यात आला असुन या विक्रमी अव्वल प्रकल्पाचा शुभारंभ व शेतकरी सहकार मेळावा रविवारी ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता संजीवनी विद्यापिठाच्या प्रांगणात केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या नव्या प्रकल्पामध्ये प्रति दिन १२ टन क्षमतेने सी एन जी निर्माण करणारा देशातला पहीला सहकारी साखर कारखाना कोपरगाव तालुक्यातील शेतकरी ऊस उत्पादकांना वरदान ठरणार आहे.

ते पुढे म्हणाले की, कोल्हे कारखान्याच्या माध्यमातून उभ्या केलेल्या नव्या दोन्ही प्रकल्पाचा सर्वाधीक फायदा ऊस उत्पादक व शेतकऱ्यांना होणार आहे. ऊसाला अधिकचा भाव मिळणार आहे तसेच कारखान्याच्या सीएनजी पंपामुळे कमी दरात सीएनजी इंधन मिळेल पर्यायाने ऊस वाहतुकीचा खर्च कमी झाल्यास शेतकऱ्यांच्या उसाला एफ आर पी पेक्षा वाढीव दर मिळणार आहे. तसेच पोटॅश हे भारतात कुठेच उपलब्ध नाही पिकांच्या वाढीसाठी पोटॅश हा महत्वाचा घटक आहे. तेच पोटॅश ऊसाला दिल्यानंतर ऊसाचे गाळप केल्या नंतर साखर काढून झाल्यावर राहीलेल्या मळीतून अल्कोहोल काढल्यानंतर उरलेल्या सांडपाण्यात पोटॅश व इतर काही घटक आढळून येतात.

त्यावर खास प्रक्रीया करुन पुन्हा पोटॅश वेगळे काढण्याचा प्रकल्प कोल्हे कारखान्याने उभा केला. जेणे करून खतांच्या रुपाने फर्टीलायजर कंट्रोलच्या सुचनेनुसार निर्माण झालेल्या खतात १६ टक्के पोटॅश व इतर घटक आहेत त्यामुळे हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना नाममात्र दराने मिळणार आहे. तसेच अनेक कृषि उत्पादक कंपन्या बरोबर कोल्हे कारखाना करार करणार आहे.अशा या ऐतिहासिक प्रल्पाच्या उद्घाटनाला व शेतकरी सहकार मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन विवेक कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.
