शेवगाव प्रतिनिधी, दि.३० : आव्हाने येथील स्वयंभू गणपती मंदिर देवस्थानात सोमवारी संकष्टी चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी सात वाजता गंगा जलाने श्रींना स्नान घालून अभिषेक, महाआरती करण्यात आली. दिवसभर असंख्य भाविकांनी स्वयंभू श्री गणेशाचे भक्तिभावे दर्शन घेतले.
संध्याकाळी सहाला गणेश महाराज रणमले यांचे जाहीर हरी कीर्तन झाले त्यानंतर सातला रायभान नांगरे यांचे हस्ते महाआरती व महाभिषेक करण्यात आला. दुपारी बाराला तसेच रात्री नऊ ला भाविकासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर दादोबा देव एकतारी भजनी मंडळाचा जागर कार्यक्रम झाला.
देवस्थानचे अध्यक्ष मालोजी भुसारी, सरचिटणीस अर्जुन सरपते, अंकुश कळमकर, सुधाकर चोथे, कारभारी तळेकर, रामभाऊ दिवटे, भाविकाच्या मदतीसाठी दिवसभर देवस्थानात तळ ठोकून होते भाविका दिली आहे.