कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कोपरगाव शहरात प्रथमच महिलांच्या विविध त्वचा विकारांसंबंधी मुंबई येथील महिला त्वचारोग तज्ञ डॉ. विशाखा धोर्डे – मातेले यांचे मार्फत निशुल्क तपासणी व वैद्यकीय शिबिराचे आयोजन रविवार दि. १४ एप्रिल सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तसेच सोमवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत धोर्डे बिल्डिंग, धारणगाव रोड, पोष्ट ऑफिस जवळ, येथे करण्यात येणार सल्याची माहिती डॉ. विशाखा धोर्डे मातेले यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे.
डॉ. धोर्डे पुढे म्हणाल्या की, महिलांना अनेक त्वचा विकारांना सामोरे जावे लागते अनेक महिलांना त्वचा विकार भेडसावतात परंतु लाजेपोटी अनेक महिलांची उपचारासंबंधि अनास्था असते. त्यामुळे वेळेत उपचार न घेतल्याने पुढे त्वचा विकारांमुळे गंभीर स्वरुपाचे आजार होण्याची शक्यता असते व अनेक समस्यांना महिलांना तोंड द्यावे लागते.
महिलांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता या निशुल्क शिबिरात जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. विशाखा यांनी केले आहे. शिबिरात शरीरावरील पांढरे व काळे डाग, कोड अंगावरील पांढरे चट्टे, बांग, सौरायसिस, गजकर्ण, खरुज, इसब, नागवेडा, बैड, कुष्ठ रोग यासह इतर त्वचेच्या आजारांवर निशुल्क तपासणी केली जाणार आहे, महिलांनी शिबिरासाठी 7719035336, 9604293966 या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करून येताना जुने रिपोर्ट सोबत घेऊन यावे.