संजीवनी विद्यापीठाच्या वैष्णवी घोरपडेने घेतली लंडनची डिग्री

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील शिंगणापुर येथील कुमारी वैष्णवी भरत घोरपडे हीने युनायटेड किंगडम (लंडन) येथील कॉन्व्हेंट्री विद्यापीठातुन मास्टर

Read more

समता इंटरनॅशनल स्कूलला अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : समता इंटरनॅशनल स्कूलचे आदर्श व्यवस्थापन आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अंमलात आणलेला समता पॅटर्न, या पॅटर्नच्या

Read more

भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

कोपरगाव प्रतिनिधी, दि २९ :  पोहेगाव येथील भी. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये रवी राजमाने (येळावी, सांगली), विठ्ठल खिलारी (शेनवडी, सातारा), महादेव माने (खंडोबाची वाडी, सांगली), ऐश्वर्य पाटेकर (नाशिक, तान्हाजी बोऱ्हाडे (कानसे, पुणे)  व डॉ. देविदास तारू (नांदेड) या लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे यांनी येथे दिली.   याप्रसंगी ट्रस्टी श्री. रमेशराव रोहमारे, श्री संदीप रोहमारे,  अॅड्. राहुल रोहमारे व प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे उपस्थित होते. भि. ग.  रोहमारे ट्स्ट तर्फे १९८९ पासून महाराष्ट्र पातळीवर ग्रामीण साहित्यातील कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी २०२३ या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. १. मव्हटी – रवी राजमाने (ग्रामीण कादंबरी,दर्या प्रकाशन, पुणे) विभागून२. सवळा – विठ्ठल खिलारी (ग्रामीण कादंबरी,दर्या प्रकाशन, पुणे) विभागून३. वसप – महादेव माने (ग्रामीण कथासंग्रह,ग्रंथाली प्रकाशन, माहीम, मुंबई)४. कासरा – ऐश्वर्य पाटेकर (ग्रामीण कविता संग्रह, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई) विभागून५. जळताना भुई पायतळी – तानाजी बोऱ्हाडे (ग्रामीण कविता संग्रह, काव्यग्रह प्रकाशन, वाशिम) विभागून६. आता मव्हं काय – डॉ. देविदास तारू (ग्रामीण आत्मकथन, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे)      प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख रुपये १५०००/ स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावर्षी कादंबरी या व कविता संग्रह या साहित्यप्रकारातील ग्रंथांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ट्रस्टकडे आलेल्या एकूण ६० साहित्यकृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य डॉ. शिरीष लांडगे,  लक्ष्मण बारहाते, डॉ. विजय ठाणगे, डॉ.  जिभाऊ मोरे व डॉ. गणेश देशमुख यांच्या संयुक्त  निवड समितीने केले.            वरील ग्रंथांशिवाय निवड समितीने जखडण (भीमराव वाघचौरे), ओवाळणी (हरिश्चंद्र पाटील), बयनामा (बा.बा. कोटंबे),  हंबरवाटा(संतोष आळंजकर),  काळजाचा नितळ तळ(भीमराव धुळुबुळू), पांडुरंगाच्या देशा(डॉ. सदानंद भोसले), ग्रामीण साहित्य चळवळ (डॉ. वासुदेव मुलाटे) या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून विशेष निर्देश केला आहे. पुरस्कृत ग्रंथांबद्दल निवड समितीने म्हटले आहे की “वहिवाटीची वाट कधी कधी शेतकऱ्यांच्या जगण्यावरच उठत असते. याच शेतातल्या  वाटेसाठी अनेक पिढ्या कोर्ट कचेऱ्या करतात. खून, मारामाऱ्या करतात. प्रशासनही या प्रकारात सामील असते. हा सारा गुंता रवी राजमाने यांच्या ‘मव्हटी’ या कादंबरीत  चित्रित झाला आहे.  तर विठ्ठल खिलारी यांच्या ‘सवळा’ या पहिल्याच कादंबरीत ऊन, पाऊस सहन करत कोयत्याच्या आधारावर भाकरीचा तुकडा शोधणाऱ्या  ऊसतोड कामगाराच्या मुलाची करुण कथा अत्यंत जिवंत पद्धतीने चित्रीत केलेली आहे.  एकीकडे जगण्यासाठी जीवघेणा संघर्ष आणि दुसरीकडे घेतलेले शिक्षण कुचकामी ठरवणारी भ्रष्ट व्यवस्था याचे प्रत्ययकारी चित्रण वाचकांना खिळवून ठेवते. ‘वसप’ या कथासंग्रहातील महादेव माने यांच्या कथांमध्ये रानशिवारातील शेतकरी शेतमजुरांचे जीवघेणे कष्ट, विवंचना आणि समस्या त्याचबरोबर शेतमजूर आणि पशुपालन जगाच्या सहजीवनाचा तसेच अडचणींचा परिसर 

Read more

शेतीच्या वादातील आरोपींना ३ वर्षाचा कारावास

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील शेतीचा बांध कोरल्याच्या कारणावरून तीन जणांना लोखंडी पाईपने केलेल्या हाणामारीत तीन जण

Read more

७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ – आमदार काळे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ :  पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांचे रब्बी हंगाम २०२४-२५ साठी ७ नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी केलेल्या

Read more

कोपरगाव शहरात रस्ता कॉंक्रिटीकरण व सुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपये मंजूर – नितीनराव औताडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ :  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी विकासाला गती देण्यासाठी विविध नगरपंचायतींना नगरविकास मंत्रालया अंतर्गत

Read more

सोमैया महाविद्यालय संविधान दिन साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा

Read more

डॉ. कांतिलाल वक्ते यांना होर्टीप्रो इंडियाचा लँडस्केपिंग पुरस्कार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कोपरगावचे भूमीपुञ वनस्पती शास्ञज्ञ डॉ. कांतिलाल वक्ते यांना जागतिक ख्यातीच्या होर्टीप्रो इंडिया २०२४ चा सर्वोत्तम लँडस्केपिंग

Read more

प्रत्येक शासकीय कार्यालयात संविधान उद्देशिकेची कोनशिला उभारावी – विधीज्ञ गणेश मोकळ 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २६ :  घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंडप्राय भारत देशासाठी संविधान दिले त्या घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष

Read more

कोल्हेंनी युतीचा धर्म पाळल्याने विजयाचा वारु सुसाट 

निवडणुकीत न लढता ही कोल्हे जिंकले, जिल्ह्यात रंगली चर्चा कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ :  कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत कोल्हे परिवाराने

Read more