शेवगाव प्रतिनिधी, दि.२२ : असंघटीत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सेवा देणाऱ्या जनशक्ती श्रमिक संघ शेवगाव-पाथर्डी संघटनेच्या कार्यकारणीची बैठक नुकतीच घेण्यात आली. यामध्ये इमारत बांधकाम कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी जनशक्ती श्रमिक संघाच्या नवीन सल्लागार समितीची नेमणूक याकार्यकारणी बैठकीत करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्ष स्थानी श्रमिक संघाचे संस्थापक अॅड.शिवाजी काकडे होते. संघाचे सचिव अकबर शेख, उपाध्यक्ष भारत लांडे, संचालक राजेंद्र पोटफोडे, राजेंद्र फलके,आदि यावेळी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ज्ञानेश्वर बोडखे-खरडगाव, सुनील दारकुंडे-दादेगाव, रामनाथ भालेराव-माळेगाव ने, दत्तात्रय बोरुडे-ढोरसडे यांची संघटनेच्या सल्लागार पदी एकमताने नियुक्ती करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी जि.प. सदस्या हर्षदा काकडे म्हणाल्या, योजनेपासून वंचित राहिलेल्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम करायचे आहे. काही बांधकाम कामगार हे अशिक्षित असतात.
त्यांच्या घरोघर जाऊन त्यांना कल्याणकारी योजना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समजावून सांगून त्यांना त्या मिळून देण्याचे काम सर्वांनी करावे. यावेळी अॅड.शिवाजी काकडे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक संजय दुधाडे यांनी तर अमोल बोडखे यांनी आभार मानले.