निळवंडेच्या चाऱ्याही लवकरच पूर्ण करणार, प्रचार दौऱ्यात लोखंडे आश्वासन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : निळवंडे कालव्याचे कालवे प्रवाहीत करण्याचे भाग्य आपल्याला लाभले. यासाठीचा संघर्ष आपण सर्वांनी पाहिला आहे. मुंबईला जलदिंडी काढणे असो की, दिल्लीतील केंद्रीय जलआयोगाची मान्यता आणण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी आपल्याबरोबर होते. प्रकल्पाची सुधारीत प्रस्तावित मान्यता घेण्यापासून नाबार्डचा निधी मिळवण्यापर्यंत आपण सर्व साक्षीदार असून खऱे काम कोणी केले हे सर्वांना माहिती आहे. निळवंडे धरणाचे कालवे प्रवाहीत झाले आहे. चाऱ्या पूर्ण झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने प्रकल्प पूर्ण होणार नाही व मलाही समाधान मिळणार नसल्याचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रचार दौऱ्या निमित्त बैठकीत ते बोलत होते. 

समन्यायी पाणी वाटप या काळ्या कायद्यामुळे आपल्या धरणातील पाणी पंचवीस टक्के कमी झाले. याचा फटका गोदावरी कालव्यांसह भंडारदरा व निळवंडेच्या लाभक्षेत्रालाही बसला आहे. चाऱ्यांची कामे पूर्ण झाली नसल्याने ओढ्याला पाणी सोडण्यात आले. ज्या भागातील ओढे हे निळवंडे कालव्यांना लागून आहे तेथे पाणी देणे शक्य झाले. पंरतु सर्वांना समान न्याय द्यायचा असेल तर चाऱ्यांची कामे होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकार देखील सहकार्य करणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. चाऱ्यांचा सर्वे पूर्ण झाला आहे. सर्वे लवकर व्हावा यासाठी राज्य सरकारने खासगी एजंसी नेमली होती. त्याचा आराखडा तयार झाला आहे. चाऱ्यांचे टेंडर लवकरच निघणार असल्याचेही लोखंडे यांनी यावेळी सांगितले. 

यंदा आवर्षण- प्रवण क्षेत्रात पावसाचे प्रमाण फारच कमी होते. दिवाळी नंतर तात्काळ पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. पशुधनही जगविणे अवघड झाले होते. पंरतु निळवंडेचे पाणी ओढ्या- नाल्याला सुटल्याने काही अंशी दुष्काळाच्या झळा कमी झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने दुष्काळ हटविण्यासाठी चाऱ्यांची कामे होणे अपेक्षित आहे. ते आपण लवकरच मार्गी लावू असा विश्वासही लोखंडे यांनी व्यक्त केला. 

घाटमाथ्याचे पाणी पूर्वेस वळविल्याशिवाय गोदावरी, प्रवरा व मुळा खोऱ्यात समृद्धी येणार नाही. अतिरिक्त पाणी वाढले तर जायकवाडी बरोबर आपला देखील प्रश्न सुटू शकतो. पूर्वीचे वैभव नक्कीच प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. घाटमाथ्याचे पाणी वळविणे सारख्या मोठे विषय मार्गी लावण्साठी खंभीर सरकारची आहे. ही क्षमता फक्त मोदी व शिंदे सरकार मध्ये असून त्यासाठी आपण त्यांचे हात बळकट करावे असे अवहानही लोखंडे यांनी व्यक्त केले. 

या प्रचार दौऱ्यात निळवंडे पाटपाणी कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागो जागी स्वागत करण्यात आले त्यावेळी चाऱ्यांची कामे खासदार सदाशिव लोखंडे हे मार्गी लावू शकतात असा विश्वासही उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला. निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळक यांनीही निळवंडेच्या पाण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांचे हात बळकट करावे अशी विनंती केली. 

प्रचार दौऱ्यात दत्ता भालेराव, बाळासाहेब रहाणे, राजेंद्र सोनवणे, विठ्ठल घोरपडे, विजय मगर, आण्णाभाऊ वाघे, सुरेश वाघ, रविंद्र वाघ, आण्णासाहेब गांगवे, सोमनाथ झिंजुर्डे, भारत कोल्हे, विकास गांगवे, साईनाथ जाधव आदी समितीच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे नितीन कापसे, कैलास रहाणे,  बाळासाहेब गोर्डे, गजानन मते, नानासाहेब वर्पे, संतोष वर्पे, शिवसेना संघटक विजय काळे, तालुका प्रमुख सागरे बोठे, अक्षय सदाफळ, सुनिताताई शेळके, अर्चनाताई निभे, सोमवंशी ताई, विश्वास त्रिभुवन, मनसे जिल्हा प्रमुख राजेश लुटे, गणेश जाधव, लक्ष्मण कोटकर आदी पदाधिकारी यांच्यासह कोपरगाव तालुका प्रमुख रावसाहेब थोरात, संजय गुरसळ, अभिषेक आव्हाड, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे, मिनाक्षीताई वाकचौरे, विजया दौंड, हेमता तौरेज, आरती गाडे, अक्षय जाधव, अभिषेक आव्हाड, मनोज राठोड, शिवाजी जाधव, पवन गायकवाड, भारत कुऱ्हाडे, अविनाश उपाध्ये, देवा लोखंडे, मनिन नरोडे, बाळासाहेब बडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.