शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : भाजपा सरकार पुन्हा सत्तेवर आले तर आपला मताचा अधिकार अबाधित राहिल काय ? अशा शंकेने सर्व सामान्य नागरिक सावध झाला आहे. सध्या देशातील प्रचड महागाई व विविध कराच्या ओझ्याने गरीबांचे जगणे मुष्कील झाले आहे. सर्व क्षेत्रात आर्थिक विषमता वाढली आहे. यामुळे या निवडणुकीत या परिसरातील स्वाभिमानी जनता कोणाच्याही प्रभावाखाली न येता करेक्ट कार्यक्रम करणार असून लोकसभेत सर्वसामान्याच्या मनातील निलेश लंके यांना साथ देईल असा विश्वास शरदश्चंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयत पाटील यांनी येथे व्यक्त केला.
तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे महविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते. खा. सुप्रीया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, कॉग्रेस, भाकप, आम आदमी पार्टी व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, या सरकारने ठराविकांचे हीत जोपासल्याने देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्याचेच काम गेल्या दहा वर्षात झाले. याचा निवडणुकीत जाब विचारण्याची संधी लोकांना मिळाली आहे. अनेक सहकारी सोडून गेल्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी जनतेच्या जीवावर पुन्हा एक वार राष्ट्रवादी पक्ष प्रभावी पणे उभा करण्याचा निर्धार केला असून सर्व ठिकाणी नवीन कार्यकर्ते पाठीशी उभे राहिले आहेत. या परिसरात प्रभावीपणे जनहिताचे काम करणाऱ्या लंके यांना उमेदवारीची संधी दिली. त्यामुळेच या मतदार संघात राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. विरोधक घाबरल्याचे हे द्योतक आहे.
खा . सुप्रिया सुळे म्हणाल्या, समाजात लढणाऱ्याचाच इतिहास लिहिला जातो. देशात राजकीय हवा बदलत चालल्याचे चित्र आहे. या परिसरातील जनतेने आपला प्रतिनिधी केवळ बाके वाजवणार नसावा, जनतेच्या समस्या प्रभावी पणे मांडणारा असावा याचा निर्णय घेण्याची हीच वेळ असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन कांदा पिकाला हमी भाव, या बाबत संसदेत प्रभावी पाठपुरावा करण्यात आघाडीवर राहिल्याने आपल्यावर निलंबनाची वेळ आली.
मात्र आपले बोलणे खरे व स्पष्ट असल्याने तब्बल पाचवेळा संसदरत्न पुरस्काराने आपला गौरव झाला. या निवडणुकीत विकासाच्या कोणत्याही मुद्यावर चर्चा दिसत नाही वैयक्तिक टीकेचा भडीमार सुरु असल्याने जनतेने आता ऐकावे जनाचे करावे मनाचे असा निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उमेदवार लंके म्हणाले, तुम्ही माझ्या साठी राहिलेले दोन दिवस द्या पुढील पाचवर्ष मी आपला सेवक म्हणून प्रभावी काम करून जनतेला न्याय मिळवून देईल. अशी ग्वाही दिली. ॲड प्रताप ढाकणे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी राजेंद्र फाळके, राजेंद्र दौंड, बाळासाहेब काळे, शिवशंकर राजळे, ऋषिकेश ढाकणे, अजित फाटके, राजेंद्र दौंड, कॉ .सुभाष लांडे, राजेंद्र दळवी, सुनिल रासने, रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर, निलेश जाधव, संभाजी पालवे, समीर काझी, संजय नांगरे, योगिता राजळे, विद्या गाडेकर, एजाज काझी, राम शिदोरे, राजेंद्र आढाव, दत्तात्रय फुंदे, आदिसह घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. हरिष भारदे यांनी आभार मानले, दिपक कुसळकर यांनी सुत्रसंचलन केले.