सामाजिक उपक्रमात ठोळे परीवार सदैव जेष्ठ नागरिक संघासोबत – कैलासचंद ठोळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : येथील जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै. भागचंद भाऊ ठोळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करताना कैलास शेठ ठोळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या वेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘ कै. भागचंद भाऊ यांनी जे स्वप्न, जे विचार बाळगून जेष्ठ नागरिक सेवा मंचची स्थापना केली तो विचार, सेवाभाव जपण्यासाठी आमचा ठोळे परीवार आजही कटिबद्ध आहे. सामाजिक सेवाभावी उपक्रमात पाहिजे ती मदत करायची तयारी आहे.

जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या माध्यमातून आजतागायत अनेक सामाजिक सेवाभावी उपक्रम राबविले गेले आहेत. वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आहेत, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले असून इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा दिली गेली आहे. यापुढेही मदतीला आम्ही कटिबद्ध राहु. असे विचार व्यक्त केले.

जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंद भाऊ ठोळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित समारंभात स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले डॉ. विलास आचारी, उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले, महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले.

पुण्यस्मरण दिनानिमित्त कै. भागचंद भाऊ ठोळे यांच्या पत्नी श्रीमती कमलबाई ठोळे, चार्टर्ड अकौंटंट एस एल कुलकर्णी, विधिज्ञ शंतनु धोर्डे, ऊत्तमभाई शहा, आशुतोष पटवर्धन, पेंटर महंमद दारुवाला, मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे, सौ. सुनयना केळकर, मयुर जोबनपुत्रा, हेमचंद्र भवर, भागचंद माणिकचंद इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते. विशालशेठ ठोळे यांनी आभार प्रदर्शन केले.