अहमदनगर प्रतिनिधी, दि. २४ : बेलापुरचे उद्योजक सुभाष अमोलिक यांची कन्या भूमि सुभाष अमोलिक हिने सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवुन विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
नगरच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये सीबीएसई दहावीच्या परीक्षेत भूमि सुभाष अमोलिक हिने ९६.०२ टक्के गुण मिळवून विद्यालयात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. भूमी सुभाष अमोलिक ही श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील रहिवासी असुन ती नगरच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षण घेत होती.
तीला विद्यालयाच्या प्राचार्या ओरी, अध्यापिका निकिता गायकवाड, श्रीमती शोभा यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. भूमि अमोलिक हिच्या यशाब बेलापूरचे सरपंच व भूमिच्या भगिनी स्वाती अमोलिक,उप सरपंच मुश्ताक शेख, जि.प. सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्यासह जिल्हाभरातील अनेक मान्यवरांनी भूमि सुभाष अमोलिक हिचे अभिनंदन करुन भावी शैक्षणिक जीवनाला शुभेच्छा दिल्या.