गरजवंताना मदत करण्याचे कार्य अलौकिक – आमदार मोनिकाताई राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : विविध क्षेत्रात दैदिप्यमान, उत्कृष्ठ कामगिरी करूनही  प्रसिद्धी पासून दूर असलेल्या विभूतींचा शोध घेऊन त्यांचा यथोचित गौरव व्हावा तसेच समाजाने त्यांच्या  कार्यापासून  प्रेरणा घ्यावी या उद्देशाने येथील श्री गुरुदत सामाजिक मंडळ करत असलेले कार्य निश्चीत  प्रशंसनिय आहे असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले. पपु योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सव व त्यानिमित्त संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आध्यात्मिक, सामाजिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात आ. ‘राजळे बोलत होत्या.

त्यापुढे म्हणाल्या, मानवधर्म सर्व श्रेष्ठ असून समाजातिल गरजवंताना मदत करण्याचे कार्य अलौकिक असते. शेवगाव येथील गुरुदत्त सामाजिक मंडळाच्या वतीने राज्यातील. अशा थोर विभूतींना शोधून त्यांना  सन्मानित करण्याची संकल्पना आदर्श आहे. वैशंपायन नगरमधील श्री दत्त देवस्थान क्षेत्र तिर्थ क्षेत्र म्हणून राज्यात नावारूपाला यावे. अशी सदिच्छा व्यक्त करून या देवस्थानला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी एक साधक म्हणून तुमच्या बरोबर असेन अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

  पुणे येथील श्री स्वामी समर्थ कृपाकिन्त नारायण भाटे काका, नाथ सप्रदायाचे संशोधक ‘ तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांचा आध्यात्मिक पुरस्काराने तसेच निश्चलपुरी फौंडेशन लातूरचे डॉ धर्मवीर भारती यांचा सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. नाशिक येथील गजानन कस्तुरे, एमएसडीएल मुंबई वीत्त विभागाचे संचालक अनुदीप दिघे, शरदकाका वैशंपायन आदिंची प्रमुख उपस्थि होती.

गजानन कस्तुरे म्हणाले, मनुष्याने मध्यम मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जीवनात संकट आले तर मनात उमेद असलेला दिवा विझु देऊ नका, मन, बुद्धी, चित्त व अहंकार  बाजूला सारून चिंतन करणे, स्वतःसी बोलणे महत्वाचे आहे. ज्येष्ठ साधक पी.बी. शिंदे यांनी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले अपर्णा फड यांनी सत्कार मूर्तींचा परिचय करून दिला.

     पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, ॲड. विजय काकडे, सुनिल रासने, महेश फलके, उपअभियता प्रल्हाद पाठक, बाळासाहे  मुरदारे, नवनाथ कवडे आदि मान्यवरांची उपस्थित उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष अर्जून फडके यांनी स्वागत तर सचिव फुलचंद रोकडे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप फलके यांनी सुत्रसंचलन केले काकासाहेब लांडे यांनी आभार मानले.