तब्बल ४० वर्षानंतर वस्तीगृहातील विद्यार्थी आले एकत्र

 कोपरगाव प्रतिनिधी, २७ : नुकताच कोपरगाव शहरात  शेतकरी व माळी बोर्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा संपन्न झाला आहे तब्बल ४० वर्षानंतर माजी विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आले आहे .शेतकरी आणि माळी बोर्डिंग माजी विद्यार्थी छात्रवास फाउंडेशन कोपरगाव यांच्या वतीने २५ मे २०२४ रोजी माळी बोर्डिंग या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते या सस्नेह मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले होते.

तब्बल ४० वर्षानंतर वस्तीगृहातील विद्यार्थी एकत्र आले आहे. अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचा साधनेही संमेलन पार   पडले आहे. परंतु वस्तीगृहातील सहस्नेहसंमेलन पहिल्यांदाच पहावयास मिळत आहे. शेतकरी माळी बोर्डिंग च्या माजी विद्यार्थी यांनी आपल्या अनेक आठवणी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. अत्यंत गरिबीतून शिक्षण घेऊन आज अनेक माजी विद्यार्थी मोठे अधिकारी  झाले तर कोणी राजकारणात तर कोणी उद्योगात यश मिळविले आहे. मोठमोठे अधिकारी झालेल्या माजी विद्यार्थी एकत्रित आल्यानंतर आपल्या जीवनाची व्यथा या ठिकाणी ते सांगत होते.

अत्यंत गरिबीत जीवन जगत असताना या वस्तीगृहातील शिक्षक जंगले सर आणि त्यांची पत्नी त्याचबरोबर चौधरी सर व त्यांची पत्नी यांनी अत्यंत मुलांसारखे जीव लावला. त्यांच्या संस्कारामुळेच आम्ही आज अधिकारी होऊ शकलो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे.

भीमराज सुखदेव रणशूर यांनी माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणले आहे. या कार्यक्रमासाठी भीमराज सुखदेव रणशूर केशवराव गायकवाड शिवाजी ससाने, राजू जंगले ,दिलीप झाल्टे साहेबराव कोपरे गवनाथ डोखे दिलीप रणशूर दिलीप रणधीर, नानासाहेब रणशूर, मोतीराम शिंगाडे, राजेंद्र वानखडे यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते.