शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : तालूक्यातील सुळे पिंपळगाव येथील दोन गटात हाणामारी झाली असून एकमेकांनी शेवगाव पोलीसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
यासंदर्भात पहिली तक्रार दिलीप बलभिम देशमुख (वय ५५ ) यांनी दिली असून पंडीत भानुदास माळी, सुरेश पंडीत माळी आणी गोरख पंडीत माळी यांनी मंगळवार दि. ४ जुन रोजी सकाळी ८ वाजताचे सुमारास गुरांच्या गोठ्या समोर येवून शेतीच्या बांधावरून कुरापत काढली. त्यांचे हातात कोयता, चाकू गुप्ती, वस्तारा, काठया आणि दगड होते. त्यांनी दिलीप देशमुख व त्यांचा पुतण्या अशोक बबन देशमुख, तसेच कल्याण विठ्ठल देशमुख आणी नातू ऋषीकेश कल्याण देशमुख यांना या हत्याराने जिवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करून जखमी केले. अशी तक्रार दाखल केली आहे.
दिलीप देशमुख यांच्या तक्रारी वरून शेवगांव पोलीसांनी पंडीत भानुदास माळी, सुरेश पंडीत माळी आणी गोरख पंडीत माळी यांचे विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३२६, ३२४, ५०४, ५०६, 3४ प्रमाणे गुन्हा दाखल केलाआहे.
तर विरोधी माळी बंधुच्या तक्रारीवरून पोलीसांनी देशमूख यांचे विरोधात अदखलपात्र गुन्हाची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल पवार हे करीत आहेत.