शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय स्पर्धा परीक्षामध्ये शेवगाव येथील सिद्धार्थ किसन चव्हाण यांची वाणिज्य व उद्योग मंत्रालयामध्ये पेटंट ऑफिसर (क्लास वन राजपात्रित अधिकारी ) म्हणून निवड झाली आहे. देश स्तरावर पूर्वपरीक्षा मुख्यपरीक्षा आणि नंतर तोंडी मुलाखत होऊन अंतिम निवड झाली आहे.
या अगोदर सिद्धार्थ यांची महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये देखील नगरपालिका संगणक अभियंता अ श्रेणी पदी निवड झालेली आहे. सिद्धार्थ यांचे शालेय शिक्षण शेवगाव येथील रेसिडेन्सीयल हायस्कुल मध्ये झाले असून पुणे येथील सी ओ इ पी अभियांत्रिकी महाविद्यालयातूशेवगावन ते कॉम्पुटर इंजिनियर झाले आहेत.
सिद्धार्थ हे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा वडुले खुर्द च्या श्री संत वामनभाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. किसन चव्हाण यांचे चिरंजीव आहेत. या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.