कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : कोरोना काळात डॉक्टर, नर्सेस व त्यांचे सलग्न इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा भारतातील नागरिकांना दिली. म्हणून त्यांचे योगदान कधीही विसरता कामा नये असे प्रतीपादन लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष ॲड. मनोज कडू यांनी डॉक्टर्स डे निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.
डॉक्टर डे औचित्य साधन लायन्स क्लब कोपरगावच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी जेष्ठ उद्योजक तुलसीदास खुबानी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. गुट्टे, डॉ. अतिश काळे, डॉ. तुषार गलांडे आदी मान्यवरांची भाषणे झाली.
सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. रणदिवे, डॉ. विलास आचारी, डॉक्टर काजल गलांडे, डॉ. विलास आचारी, डॉ. काजल गलांडे, ला. राजेंद्र शिरोडे, ला. परेश उदावंत, ला. अंकुश जोशी, ला. शाम जंगम, डॉ. संजय उंबरकर, डॉ. अमित नाईकवाडे ला. संदीप राशिनकर ला. संजय उदावंत ला. अनिकेत भडकवाडे आदी मान्यवर उस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लबचे खजिनदार ला. कैलास नागरे यांनी केले.