शेवगाव प्रतिनिधी, दि. २२: वादविवाद प्रसंगी कोर्ट कचेरीच्या फंदात न पडता मध्यस्ती माध्यमातून आपसात वाद मिटवलेले केव्हाही चांगले, यामुळे पैसा आणि वेळ वाचून सामाजिक बंधुभाव जपला जातो असे प्रतिपादन शेवगाव न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश श्रीमती संजना जागुष्टे यांनी केले आहे. तालुका विधीसेवा समिती आणि शेवगाव तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने वाघोली येथे महिलां विषयीच्या कायद्याबाबत जनजागृती शिबिरात न्या. जागुष्टे बोलत होत्या.
यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती त्यांनी दिली. वाघोलीच्या सरपंच सुश्मिता उमेश भालसिंग व ग्रामसेविका जनाबाई फटाले यांच्या हस्ते वाघोली ग्रामपंचायत व उपस्थित सर्व महिलाच्या वतीने पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर शेवगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बुधवंत सचिव ॲड. देशमुख, ॲड. शिंदे , माजी अध्यक्ष ॲड. कारभारी गलांडे, ॲड, शेळके ॲड कराड, कोर्ट कर्मचारी दोडके आणि घुले यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी ॲड शेळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी न्या. जागुष्टे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पाहुण्यानी ग्रामपंचायत कार्यालय, स्वर्ग भूमी तसेच विविध विकास कामास भेटी दिल्या व तेथील विकास कामाची प्रशंसा केली. वाघोलीचे सरपंच उपसरपंच, सर्व ग्राम. प. सदस्य, कर्मचारी, महिला बचत गटातील महिला व ग्रामस्थ प उपस्थित होते. राजेंद् जमधडे यांनी सुत्र संचलन केले. उमेश भालसिंग यांनी आभार मानले.