शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : येथील “साहित्य आणि संस्कृती “हे ब्रीद जोपासणाऱ्या येथील महात्मा सार्वजनिक वाचनालय आयोजित’ लोकमान्य टिळक पुण्यतिथी’ निमित्त राबविलेल्या विविध उपक्रमाचा एक भाग म्हणून संपन्न झालेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यावेळी इयत्ता पाचवी ते आठवी गटातून प्रथम व द्वितीय हे दोन्ही क्रमाक या विद्यालयाच्या अनुक्रमे वैष्णवी देवढे व आमोघ उरणकर यांनी पटकावले आहेत.
तसेच इयत्ता आठवी ते दहावी मोठ्या गटात तृतीय क्रमांक – प्रियंका बैरागी हीने तृतीय क्रमांक व चारवी बाफना हीने उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली आहेत. यशश्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आयोजकांकडून प्रदान करण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे उपसचिव हरीश भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे, उपप्राचार्य संजय कुलकर्णी, गोकुळ घनवट, उमेश घेवरीकर, सदाशिव काटेकर आदींनी अभिनंदन केले.