कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहून दर्शन घेतले व उपस्थितांशी संवाद साधला.
वाकडी येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदीरात सराला बेटाचे मठाधिपती प.पु. रामगिरीजी महाराज यांच्या कीर्तनास आणि पुणतांबा येथे संत मुक्ताई ज्ञानपिठाचे प.पु. रामानंदगिरीजी महाराज यांचे प्रवचनास कोल्हे उपस्थित राहिले. तसेच ब्राम्हणगांव येथे संत सावता महाराज व संत तुकाराम महाराज मंदीरात जाउन ह.भ.प. श्रीहरी वैष्णव महाराजांचे कीर्तन व टाकळी येथे आयोजित पुण्यतिथी उत्सवास उपस्थित राहिले. रवंदे येथील सावता महाराज पुण्यतिथी व मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम चरित्र चिंतन-सत्संगाचे प्रख्यात प्रवचनकार भाऊ पाटील महाराज यांच्या अमृतवाणीचा लाभ कोल्हे यांनी घेतला व भविकांशी संवाद साधला.
संत सावता महाराज यांनी आपल्याला कर्म रुपी भक्ती मार्ग शिकवला. आपल्या दैनंदिन कामात देव देखील आशीर्वाद देत असतो. संत महंतांच्या शिकवणुकीचा कृतीयुक्त मार्गाचे कोल्हे कुटुंब अनुकरण करत आहे. जनसेवा करण्यात धन्यता मानून विविध माध्यमातून लोकोपयोगी कामात आम्हाला आनंद आहे असे प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी केले.
यावेळी वाकडी येथे गणेश साखर कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, संचालक आलेश कापसे, विष्णु शेळके,शिवाजी लहारे, डॉ. वसंत लबडे, रोहीणी आहेर, बाळासाहेब आहेर, कैलास लहारे, अमीत आहेर, प्रमोद कोते, नितीन एलम, नवनाथ शेळके, भिमराज लहारे, सागर आहेर, संजय भवर, अनिल गोरे, पुणतांबा – सुधाकर जाधव, संभाजी गमे, बबलु जाधव, बाळकृष्ण जाधव, प्रभाकर बोरनारे, भाउसाहेब जेजूरकर, गणेश बनकर, धनंजय शिंदे, अशोक शिंदे, ब्राम्हणगाव- निवृत्ती बनकर, जगन आहेर, बाळासाहेब आहेर, त्रिंबक आहेर, अनुराग येवले, चांगदेव आहेर, पांडुरंग डफाळ, ठकुनाथ आहेर, बाळासाहेब गंगावणे, बाळासाहेब बनकर, संजय शिंगाडे, शांताराम बनकर, ज्ञानदेव जगधने, साईनाथ आहेर, संतोष आहेर, संजय वाकचौरे, भागवत वाकचौरे, नानाभाउ शिंदे, राहूल शिंगाडे, अरूण महाजन, कैलास येवले, केशवराव येवले, कैलास पैठणकर, नानाभाउ जाधव, किशोर आहेर, विजय सोनवणे, बाळासाहेब असणे, प्रकाश सोनवणे, विजय कालेकर, किरण साळवे,
ऋषीकेश कदम, बिच्चुनाना जाधव, भानुदास भुसे, पोपट सोनवणे, किसन सोनवणे, वसंतराव मंडलिक, रमेश मंडलिक, संजय मंडलिक, विकी मंडलीक, शरद सोनवणे, बापू सोनवणे, नानासाहेब जावळे, ज्ञानेश्वर सोनवणे, भास्कर सोनवणे, अशोक सोनवणे, पुंजाबा सोनवणे, अमोल सोनवणे, नितीन सोनवणे, ललित सोनवणे, शशिकांत सोनवणे, टाकळी – संदीप देवकर, संजय देवकर, लक्ष्मण देवकर, दत्तात्रय मालकर, सुरेश मालकर, मच्छिंद्र मालकर, निलेश मालकर, सुनील देवकर, बाबासाहेब मालकर, राहुल मालकर आदीसह भाविक भक्त मोठ्या संख्यने उपस्थित होते.