रेंगाळलेल्या सुसज्ज बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात – आमदार राजळे

शेवगांव प्रतिनिधी, दि. ३१ : शेवगाव येथील दीर्घकाळ रेंगाळलेले सुसज्ज  बसस्थानकाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून स्थानका समोरील परिसराचे एक कोटी ९ लाख रुपये खर्चाच्या कॉक्रटी करणाच्या कामाचा प्रारंभ आज शनिवारी (दि ३१ ) आमदार मोनिकाताई राजळे यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी आ राजळे म्हणाल्या, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे माध्यमातुन बनस्थानक नुतनीकरण (पुनर्बाधनी) व इलेक्ट्रीशन कामासाठी ३ कोटी २७ लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. ऑगस्ट २०१९ मध्ये या कामाचा शुभारंभ परिवहन मंत्री रावते यांचे शुभहस्ते करण्यात आला, यानंतर राज्यात सत्तांतर झाले त्यामुळे नुतनीकरणाचे कामात दिरंगाई झाली, पुन्हा भाजप शिवसेना मित्रपक्षाचे सरकार राज्यात आल्यानंतर कामाची सुरूवात होऊन काम पुर्णत्वास आले आहे.

मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे बसस्थानकाचे काँक्रीटीकरणाचे कामासाठी आर्थिक तरतूदीची मागणी केली असता, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातुन शेवगांव बसस्थानकाचे काँक्रीटीकरण कामासाठी १ कोटी ९ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. आज शनिवारी प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली.

राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे माध्यमातुन या निधीची तरतुद केली असुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अहमदनगर विभागांतर्गत कार्यन्वित यंत्रणा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अहमदनगर यांचे माध्यमातुन हे काम होत आहे.

यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब भोसले, भाजपा शहराध्यक्ष बापु धनवडे, भिमराज सागडे, मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधावणे, नगरसेवक सागर फडके, महेश फलके, गणेश कोरडे, राजाभाऊ लड्डा, गंगा खेडकर, डॉ. निरज लांडे, अमोल माने, केशव आंधळ, उमेश धस, अमोल घोलप, रविंद्र धोत्रे, सतिश म्हस्के, किरण काथवटे, सुरेश थोरात, नितीन मालानी, विनोद शिंदे, कैलास सोनवणे, मच्छिंद्र बर्वे तसेच शेवगांव आगार व्यवस्थापक अमोल कोतकर, विभागीय अभियंता राशीनकर, स्थानक प्रमुख किरण शिंदे, अदिनाथ लटपटे, राजेंद्र घुगे, एस.टी बँक संचालिका संध्या दहिफळे, अरूण गर्जे, जगन्नाथ पवार, प्रकाश खेडकर व राज्य परिवहन महामंडळाचे  कर्मचारी उपस्थित होते.

आमदार मोनिका राजळे यांनी पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांना बसस्थानकामध्ये बोलवून  शालेय विद्यार्थीनी व प्रवाशांचे सुरक्षतेबाबत चर्चा करत बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी बसस्थानकात उपस्थित शालेय विद्यार्थ्यासमवेत संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या, विद्यार्थीनीनी देखील विविध बसेसच्या वेळापत्रकासह स्थानक परिसरात येणाऱ्या अडचणी संदर्भात मन मोकळेपणाने आ. राजळेंशी चर्चा केली. आ राजळे यांनी यासंदर्भात संबंधितांना  तातडीने लक्ष घालून सुधारणा करण्याच्या सूचना  दिल्या.