गीत गायन स्पर्धेत दत्तात्रय लांडगे प्रथम

राहाता प्रतिनिधी, दि. २७ : राहाता तालुका विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत जि. प. प्राथमीक शाळा चारी नंबर १५ चा विद्यार्थी दत्तात्रय प्रकाश लांडगे याने मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर पात्र ठरला आहे.

या विद्यार्थ्याने मिळवलेल्या यशाबद्दल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आरणे व सदस्य भिमराज गायकवाड यांनी त्याचा सन्मान केला तर या विद्यार्थ्याला राहाता तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य  मुख्याध्यापक  मच्छिंद्र वडने  यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी भालचंद्र तांदळे, विनोद तोरणे, सुरेश भिंगारदिवे, सुनील गायकवाड, सुनिता गागरे, अमोल तुपविहिरे यांनी परिश्रम घेतले दत्तात्रयाच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply