माजी नगराध्यक्ष रावसाहेब बोठे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

 राहाता प्रतिनिधी, दि. २४ : नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब धोंडीबा बोठे पाटील यांच्या दशक्रियादिनी साईयोग फाउंडेशन द्वारे ह.भ.प.जगन्नाथ महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नातेवाईकांच्या हस्ते १२ फुटी वट वृक्षाचे रोपण करून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली.

तसेच संवर्धनाचे पालकत्व ही स्विकारले. साईयोग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांचे ते मेहुणे होते. श्रद्धांजली वाहताना डॉ बापूसाहेब पानगव्हाणे म्हणाले, माझ्या वैयक्तिक तसेच फाउंडेशनच्या वाटचालीत रावसाहेब पा. बोठे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

ह.भ.प.चौधरी महाराज म्हणाले, वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी साईयोग फाउंडेशनचा हा वृक्षारोपण रूपी अभिवादनाचा उपक्रम प्रशंसनीय नव्हे तर अनुकरणीय आहे.गेलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण तसेच वाढदिवस अथवा आनंदाचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा नामी मंत्र आहे. तसेच यानिमित्ताने भुमातेची सेवा होणार आहे.

याप्रसंगी गं भा सुमनताई रावसाहेब बोठे, भागवत बोठे, सुमन गोरे, विमल डांगे, दत्ता बोठे, प्रसाद बोठे, प्रमोद बोठे, डॉ रुपाली पाटील, माधुरी तांबे, शितल खैरे, रुपाली बोठे, शितल बोठे, वीना बोठे, राजेंद्र डांगे, विशाल पानगव्हाणे, तन्मय बोठे, विमल बोराडे, शांताबाई महाले, अद्वैत पाटील, जानव्ही खैरे, आर्य खैरे, साईश बोठे, आर्वी बोठे, आद्विका बोठे, सान्वी बोठे, कृष्णाली बोठे, भाऊसाहेब बनकर, भरत दवंगे, विलास वाळेकर, मनोज पिपाडा, ॲड. गोरखनाथ दंडवते, संजय बाबर, संजय वाघमारे, ज्ञानेश्वर आरणे, विठ्ठल निर्मळ, बाळासाहेब तारगे आदी मान्यवर उपस्थित होते.