शिर्डी प्रतिनिधी, दि. ३ : सोमवारी पहाटे ४ वाजे दरम्यान साई संस्थांच्या दोन कर्मचारी ड्युटीवर जात असताना दोन व्यक्तींनी त्यांना अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत या दोन्ही व्यक्तीची हत्या केली. तसेच तिसऱ्या व्यक्तीला देखील धारदार शास्त्राने घायळ केले. दुहेरी हत्याकांडामुळे नागरिक भयभीत झाले असून यातील जखमी व्यक्तीला लोणी येथील पीएमटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी काही तास असतातच अटक केली असून यातील दुसरा आरोपी फरार आहे.
मयत सुभाष साहेबराव घोडे व नितीन कृष्णा शेजूळ या दोनही तरुणांवर शिर्डीतील कर्डोबानगर येथे पहाटेच्या सुमारास साई संस्थांनमध्ये ड्युटीवर जाताना रस्त्यात गाडी अडवून काही तरुणांनी अडवून धारदार शश्राने वार केले त्यात ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले तर वेळेवर तिथे कोणीही न पोहचल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
तर तिसरा शिर्डीतील कृष्णा देहरकर हे वयोवृद्ध आपल्या मुलाला शिर्डीतील बसस्टॅण्डवर पोहचवून येताना शिर्डी साकुरी शिवावर त्याच अज्ञात इसमांनी धारदार शास्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले असून त्यांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शिर्डीत पसरल्याने एकच खळबळ उडाली असून या दुहेरी हत्याकांडाने शिर्डी शहर हादरून गेले असून साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच डॉ. सुजय विखे पाटील, साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी साईबाबा हॉस्पिटलमध्ये येऊन मयतांच्या नेतेवाईकांचे सांत्वन करून पोलीस प्रशासनाला गुन्हेगारांना पकडण्याच्या सूचना दिल्या.
या घटनेमुळे शिर्डीत अनेकांनी हळहळ व्यक्त करत हॉस्पिटलकडे धाव घेतली. वास्तविक शिर्डीत पोलिसांकडून योग्य वेळी पेट्रोलिंग होत नसल्याने शिर्डीतील अनेक गुन्हेगारांनी डोके वर काढले असून दररोज शहरात हाणामाऱ्या, चोऱ्या, हत्त्याचा प्रयत्न, लूटमार हे प्रकार घडत असून शिर्डीत गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
गल्लोगल्ली सुरु असणारे अवैध धंदे, नशा करणाऱ्या लहान मुला मुलींच्या टोळ्या, भिकाऱ्याच्या वेषात असणारे गुन्हेगार यांच्या विळख्यात शिर्डी शहर सापडले असून शिर्डी पोलिसांची कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला आहे अशी भावना मयतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
तर शिर्डी नगरपरिषदेने व साई संस्थांनने करोडो रुपये खर्च करून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविले असले तरी ते बंद असल्याने कायदा सुरक्षेच्या दृष्टीने ते कुचकामी ठरले आहेत. शिर्डीतील गुन्हेगारी वाढत असल्याने पोलीस प्रशासन काय काम करतं हाच प्रश्न उपस्थित झाला असून आता या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षकतेचा प्रश्न निर्माण झाला असून या घटनेचे पडसाद राज्यभर व देशभर उमटले आहे. भाविकांमध्ये व ग्रस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शिर्डीत येऊन आरोपिंच्या शोधासाठी वेगवेगळ्या टीम तयार करत पोलिसांना आरोपींच्या शोध घेण्यासाठी पाठवले ही घटना घडल्यानंतर काही तासांतच या गुन्ह्यातील आरोपी किरण सदाफुले राहणार गणेशवाडी शिर्डी याला पोलिसांनी अटक केली असून त्याचा साथीदार राजू आहेर उर्फ शाक्या हा फरार आहे. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समजते तर या हत्तेत कितीजण सहभागी आहेत आणि हत्तेच कारण नेमकी काय आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.
जोपर्यंत सर्व आरोपीना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी मयतांच्या नातेवाईकांनी करतं शिर्डी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. परंतु डॉ. सुजय विखे पाटील यांनी या हल्ल्यात मयत झालेल्या दोन तरुणांच्या नातेवाईकांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल व या घटनेचा तपास करण्यासाठी हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी करू असे आश्वासन दिल्यानंतर मयत तरुणांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.