पोटच्या मुलाचा खुन करणारी आई व प्रियकराला अटक

 कोपरगाव प्रतिनिधी दि. १० :  प्रेमात अडथळा ठरत असल्याने प्रियकराने ५ वर्षाच्या मुलाचा तीच्या आईदेखत खुन केला आणि तो खुन पचवण्यासाठी खुद्द आईनेच पोटच्या मुलाला प्रियकरासाठी थेट गोदावरी नदीत फेकून देत दोघे दिड महिना फरार झाले होते अखेर पोलीसांनी या दोघांना गजाआड केले.

 या घटनेची पोलीसांनी दिलेली अधिक माहीती अशी की, २० डिसेंबर २०२४ रोजी तालुक्यातील चासनळी येथील  गोदावरी नदीच्या पुलावरून पांढऱ्या कपड्यात बांधून पाण्यात  एक अनोळखी लहान मुलाचा मृतदेह तरंगत असल्याची खबर  पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांनी  कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली. प्रथम दर्शनी लहान मुलांचा खुन नरबळीतून झाला असल्याची अफवा पसरली.

अनोळखी मुलाची ओळख पटवणे हेच मोठे आव्हान पोलीसांपुढे होते. पण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी वरिष्ठांच्या सहकाऱ्याने  खुन झालेल्या मुलाची ओळख पटवून खुन करणारे कोण आहेत याचा शोध लावला. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी शितल ज्ञानेश्वर बदादे रा.साकुरे मिग या. निफाड जिल्हा  नाशिक हि आपला मुलगा कार्तीक ज्ञानेश्वर बदादे वय ५ वर्षे याला सोबत घेवून प्रियकर सागर शिवाजी वाघ रा. बो-हाळे ता. चांदवड जि. नाशिक याच्यासह राहता तालुक्यातील डो-हाळे येथील शेतकरी सोमनाथ लांडगे यांच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला पळून आले.

नराधम सागर वाघ याला शितलचा मुलगा प्रेमात अडथळा वाटत असल्याने त्याने कार्तीकचा खुन केला. त्यात खुद कार्तीकची आईचा सहभाग होता. दोघांनी चिमुकल्या कार्तीकच्या मृतदेहाची विल्हेवाट गोदावरी नदीत लावून पसार झाले. पण ‘पुलीस के हात लंबे  होते है, या प्रमाणे फरार झालेल्या या दोघांना तपासण्यासाठी पोलीसांनी विविध पथके पाठवून जंगजंग पछाडले पण मिळुन येत नव्हते अखेर ८ फेब्रुवारीला शितल आपल्या आईला भेटण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आल्याचे पोलीसांना समजताच सापळा रचून तिला ताब्यात घेण्यात आले.

पोलीसांनी तिला विश्वासात घेवून प्रियकर सागर वाघ याची  चौकशी केली असता तो नाशिक जिल्ह्यात एका शेतकऱ्याकडे  आश्रयाला असल्याचे सांगितले पोलीसांनी सिनेस्टाईलने सापळा लावून त्याला अटक करुन कोपरगाव पोलीस पोलीस स्टेशनमध्ये आनुन अटक केले. अशी माहिती पोलीस उपाधिक्षक शिरीष वमने  व पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली.

खुण करणाऱ्या दोघांच्या तपासासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, पोलीस कर्मचारी संदीप बोटे, मधुसूदन दहिफळे, नवनाथ गुंजाळ, युवराज खुळे, रमेश झडे, राजू शेख, प्रकाश नव्हाळे, राम खारतोडे, श्रीमती भांगरे यांनी  दिड महीना आरोपींचा शोध सुरू ठेवून खुनाची उकल केली. पोलीसांनी अशक्य तपास शक्य करुन दाखवल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.