जायकवाडी धरण ९७.३० टक्के भरले

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : यंदा नाशिक जिल्ह्यात झालेल्या पर्याप्त पावसामुळे गंगापूर, नांदूर मधमेश्वर, दारणा प्रकल्प ओव्हर फुल झाले. मराठवाडयाची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात आबादान झाल्याने आज जायकवाडी जलाशय ९७.३० भरले असून धरणाचे  सहा दरवाजे आज सोमवारी अर्ध्या फुटाने खुले करून गोदावरी नदीत ३ हजार १४४  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सध्या  पाणलोट क्षेत्रातून जायकवाडी जलाशयात मोठ्या प्रमाणातआज पाण्याची आवक सुरू आहे. ही पाण्याची आवक लक्षात घेऊन  सोमवारी दुपारी सहा दरवाज्यातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विसर्ग सुरू होताच गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.