कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरील हेम केअर मोबाईल शाँपी हे दुकान फोडून ४० हजार रुपये किमतीच्या मोबाईल असेसरिजची चोरी झाल्याने सागर गडकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या चोरीचा अद्याप तपास लागला नसल्याने त्यातच दुसरी घटना घडल्याने व्यापारी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे.
सुरेगाव ग्रामपंचायत समोर गोदावरी उजव्या कँनाल लगत सागर गडकर यांचे हेम केअर मोबाईल रिंपेअरिग व अँसेसरिज विक्रीचे चार वर्षांपासून दुकान आहे सोमवारी सकाळी दुकान खोलल्या नंतर पुर्वे कडिल भिंत फोडुन चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन ब्लुटुथ हेडफोन ब्लुटुथ स्पिकर स्मार्ट वाँचेस पाँवर बँक बँटरी सह रिंपेअरिगला आलेले चार मोबाईल सह ४० हजाराचा मुद्दे माल चोरीला गेल्याचे गडकर यांचे म्हणणे आहे.
काही दिवसा पुर्वी कारखान्याच्या पेट्रोल पंपा समोरील कदम सर यांचे आँईल विक्रीचे दुकान फोडून मोठा मुद्दे माल चोरिस गेलेला होता. कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होऊन अद्याप तपास लागलेला नसतांना तोच दुसरी घटना घडल्याने व्यापारी वर्गाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोळपेवाडी – सुरेगाव परिसरात शेकडोच्या पुढे दुकान फोडीच्या घटना घडलेल्या असतांना पोलीसांना एकही गुन्हा उघडकीस आनता आला नसल्याने चोराची हिंम्मत वाढली आहे. कोळपेवाडी पोलीस आऊट पोस्टला नेमणुकिस असलेले पोलीस तालुका पोलीस ठाण्यातच ड्युटी बजावतांना दिसतात कुलुप बंद आऊट पोस्ट नेहमी गुन्हेगारी प्रवृत्तिना खतपाणी घालत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे.
उजवा कॅनाल लगत पाच चारी ते शनिमंदिर पुला पर्यंत शेकडो दुकाने असून यात किराणा, हॉटेल, स्टेशनरी, फुट वेअर , फरसाण, खानावळ, टूव्हिलर गॅरेज आदीचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षात वारंवार दुकान फोडीच्या शेकडो घटना घडल्या आहेत मात्र ऐकही चोरीचा तपास पोलीस यंत्रणा लावू शकली नसल्याने चोरांची हिम्मत वाढली जाऊन खाजगी मालमत्ता समजुन चोर चोरी करून जात असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.
दुकानाच्या पाठीमागील बाजूस गोदावरी कॅनाल डाव्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वेड्या बाभळी व बेशरमची वाढ झालेली असल्याने लपणाचा फायदा घेऊन चोर आपला कार्यभार साधतात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नामुळे दुकानदारांना विजेची सोय उपलब्ध होवुन बाजारपेठ उद्योग व्यवसायाला चालना मिळाली आहे.
दुकाना मागील बेशरम व काट्या जेसिबीने काढून रस्ता साफ होण्यासाठी व सततच्या चोरीला आळा बसावा यासाठी कोळपेवाडी – सुरेगाव व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आमदार आशुतोष काळे यांची भेट घेवुन गार्हाणे मांडणार असल्याचे समजते.