श्रीगणेश शिक्षण संस्थेच्या ६ विद्यार्थ्यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तर्फे महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशाबाबत यादी जाहीर झाली असून, श्रीगणेश शिक्षण संस्थेच्या ६ विद्यार्थ्यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झाली. तसेच ८४ विद्यार्थ्यांची विविध निमशासकीय व ऑटोनॉमस अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झाली, याबरोबरच सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रांजल शेटे हिने इतर मागास प्रवर्ग मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकविला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी दिली.

यापैकी प्रांजल शेटे, अर्चित शेलार आणि सिद्धेश दवंगे यांची कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, साक्षी तासकर आणि जय होन यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसारी आणि ज्ञानदा लहामगे हिची वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झाली. चालू शैक्षणिक वर्षात ८४ विद्यार्थ्यांची नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झाली.

यामध्ये रिद्धी लहारे, मेहेक उईके, रुद्र शिंदे, स्वप्नील वहाडणे, सार्थक जगताप, सूरज खैरे, आदित्य कोते, अजित चव्हाण, विराज गोर्डे, सुमित पगार, अनुज दिंडे, मयंक वसईकर, मयूर रोडे, ओंकार डहाळे, वैष्णवी बोरनार, श्रद्धा कोळगे, तेजस कदम, सार्थक मते, ओंकार आभाळे, ओम कोळपे, साईश बावके, अनुज दिंडे, यश शिरसाठ, शिवम दाते, अनिकेत आढाव, अंजली भामरे यांची व एकूण ८४ विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झाली.

अभियांत्रिकी प्रवेशाबाबत श्री गणेश शिक्षण संस्थेचा आलेख उंचच उंच वाढत आहे. निवड झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध आधुनिक ज्ञान घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. भविष्यात आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून हे विद्यार्थी विविध क्षेत्रात स्वतःचे, पालकांचे व देशाचे नाव उज्वल करतील, अशी प्रतिक्रिया प्रा. विजय शेटे यांनी व्यक्त केली.

“मोठमोठ्या शहरांमध्ये उपलब्ध होणारी शैक्षणिक प्रणाली श्री गणेश शिक्षण संस्थेने शिर्डी व परिसरात उपलब्ध करून दिलेली असून आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांची श्री गणेश शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. श्री गणेश शिक्षण संस्थेच्या “श्री गणेश पॅटर्नचे” हे यश आहे.” असे शेटे म्हणाले.