राष्ट्रीय स्पर्धेत संजीवनी करणार उत्तर व दक्षिण महाराष्ट्राचे  नेतृत्व

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : मेजर लिग बेसबाॅल (एमएलबी), इंडिया आणि संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या भव्य हिरव्यागार लाॅनयुक्त मैदानावर नुकत्याच विभागीय ‘एमएलबी कप रिजनल’ स्पर्धा घेण्यात आल्या.

Mypage

यात संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स अंतर्गत संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी व संजीवनी अकॅडमी, कोपरगांव यांच्या संयुक्तिक संघाने ११ वर्ष आतिल वयोगटात उत्तर व दक्षिण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावुन एमएलबी क्रीडा क्षेत्रात आपले नाव कोरले असुन आता हा संघ पंजाब मधिल प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे २ नोव्हेंबर पासुन सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत उत्तर व दक्षिण महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Mypage

पत्रकात पुढे म्हटले आहे की, एमएलबी हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ असुन जगभरात या खेळाचा प्रचार आणि प्रसार अमेरिकेमार्फत केला जात आहे. या खेळाचे भारतातील कार्यालय दिल्ली येथे असुन याच कार्यालयाच्या पुढाकाराने कोपरगाव येथे उत्तर व दक्षिण महाराष्ट्र विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पुणे, सातारा, कोल्हापुर, सोलापुर, अहमदनगर, नाशिक, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, धुळे, नंदुरबार, बीड, जालना, इत्यादी जिल्ह्यातील एकुण ३२ संघांनी सहभाग नोंदविला.

Mypage

    ‘संजीवनी ग्रुप ऑफ  स्कूल्सच्या शाळांमध्ये विध्यार्थ्यांना  समजेल   शिक्षण  देण्यासाठी कृतीयुक्त अध्ययन पध्दतीचा अवलंब करून प्रथम प्राधान्य दिल्या जाते. याच बरोबरोबर बहुआयामी विध्यार्थी घडवुन भविष्यात  ते कोणतेही आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हावे, या हेतुने त्यांच्यात शैक्षणिक अभ्यासाबरोबरच इतरही पैलुंची पेरणी करण्यासाठी संस्थेने देश  पातळीवर निपुणता पात्र प्रशिक्षक  नेमलेले असल्यामुळे खेळ, सांस्कृतिक, संगीत, कला, सायन्स अँड टेक्नॉलॉजी , इत्यादी बाबींमध्ये ते आघाडीवर असतात. याचाच परीणाम म्हणुन संजीवनी स्कूल्सचे विध्यार्थी अनेक स्पर्धांमध्ये यश  खेचुन आनतात. पालकांचेही त्यांचे पाल्य घडविण्यासाठी मोठे सहकार्य मिळत आहे.’-डाॅ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स

       

 संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संघाने कर्णधार श्रीजय निखिल बोरावके याच्या नेतृत्वाखाली, नैतिक सरोज, साईराज हाळनोर, मनन लोहाडे, हर्षवर्धन  मेमाणे, तन्मय वाळुंज, दिग्विजय शिंदे, आयुष गुंजाळ, आयुष आबक व वेदांत तमनर या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजयश्री प्राप्त करून उत्तर व दक्षिण महाराष्ट्रात अव्वल असल्याचे सिध्द केले.

Mypage

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी या सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच एमएलबी इंडियाचे प्रमुख डेविड पलेजे यांच्या उपस्थितीत मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनीही सर्व खेळाडूंचे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सचे मुख्य क्रीडा अधिकारी विरूपक्ष रेड्डी, क्रीडा शिक्षक सुजय कल्पेकर, पिन्सिपल डायरेक्टर श्री अशोक  जैन, प्राचार्या, सुंदरी सुब्रमण्यम व शैला  झुंजार या सर्वांचे अभिनंदन केले.

Mypage

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *