नीरज चोप्राने भालाफेकेत मिळविले सुवर्ण

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी दि. ०५ : चीन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा याने भालाफेकीत सर्वोच्च कामगिरी करत आपल्या देशासाठी सुवर्ण पदक पटकावले ही कामगिरी सुवर्णभेदी असून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Mypage

भारत देशाने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 80 पेक्षा जास्त पदके पटकावून क्रीडा क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. आपल्या देशात ग्रामीण भागासह शहरी भागातील खेळाडूंमध्ये क्षमता आहे त्यांना योग्य मार्गदर्शन दिले तर निश्चितच ऑलम्पिक स्पर्धेत आपला देश सर्वांच्या पुढे राहील.

tml> Mypage

बुधवारी रात्री चीन येथे झालेल्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा बरोबरच किशोर कुमार जेना या दुसऱ्या भारतीयांने देखील बेस्ट थ्रो करत पदक आपल्या नावावर केले आहे, या दोघांचाही आपल्याला अभिमान आहे असे विवेक कोल्हे म्हणाले.

Mypage