आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री राजीनामा द्याव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.०६ : नांदेड, संभाजीनगर, नागपूर व या पूर्वी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा व आवश्यक ते डॉक्टर व कर्मचारी स्टाफ नेमला नसल्याने लहान बालकांसह मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू म्हणजे सरकारी अनास्थेचे बळी असून राज्याचे आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे व राज्य कौन्सिल सदस्य कॉ. संजय नांगरे यांनी केली आहे.

Mypage

शेवगाव तहसिल कार्यालयासमोर झालेल्या सभेत ते बोलत होते. शासकीय रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध न करता सर्व सामान्य माणसांना मृत्यूच्या खाईत लोटले जात आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था खाजगीकरणाचा सरकारचा हा डाव असून जनतेने तो उधळून लावला पाहिजे. असे आवाहन करून यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लाल बावटा रिक्षा युनियनच्या वतीने शेवगाव येथे नांदेड, संभाजीनगर, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या बालकांना व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Mypage

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी कॉ. बापू राशिनकर, संदिप इथापे, राम लांडे, आत्माराम देवढे, बबन पवार, दत्ता आरे, योहान मगर, गोरक्षनाथ काकडे, अनिस खतिब, विजय मगर, मैनुद्दीन शेख, हुसेन शेख, आकाश मोहिते, अशोक गायकवाड, प्यारे गायकवाड, शंकर काथवटे उपस्थित होते. 

Mypage