कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयात भारतीय संविधान दिन आणि महाविद्यालयाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झालेल्या मढी येथील कु. पुजा गवळी आणि डाऊच बुद्रुक येथील अक्षय पवार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून माजी शिक्षण अधिकारी मा. नवनाथ औताडे साहेब उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब अंबाडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. मा.पुजा गवळी यांनी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्यातील न्यूनगंड दूर करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. अक्षय पवार यांनी मी परिस्थितीवर कशी मात केली व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा केला या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी वाचनात सातत्य ठेवावे ज्ञान मिळवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा. कष्ट करण्याची जिद्द ठेवावी अपयशाने खचून न जाता जोमाने प्रयत्न करावे.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ जावळे यांनी संविधान दिनाचे महत्त्व, संविधानाची वैशिष्ट्ये, सविधानाचे व्यापक व विशाल स्वरूप याबद्दल तपशील वार विवेचन केले , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र गायकवाड यांनी भारतीय संविधानातील, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे (कालम ३४ ते ५१) या विषयी व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नितीनराव औताडे यांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यामध्ये कुशाग्र बुद्धिमत्ता असते. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ,अभ्यासाची सातत्याचा जोरावर स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन केले.
संविधान दिना निमित्त महाविद्यालयात निबंधलेखन, संगोळी, पोस्टर प्रझेन्टेशन, घोष वाक्य इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील जगन्नाथ पाटील होन , आबासाहेब पवार , तुळशीदास दहे, भाऊसाहेब दहे, कैलास नानासाहेब गवळी , प्रवीण संजय घोलप तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.वाघमारे डी.एस.यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गांधीले बी. एस. यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. औताडे एस. आर. आणि प्रा. गोसावी एम. एस. यानी केले.