प्रभाग ३ मधील रस्त्यांचे ३० लाखाचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील प्रमुख रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी गटनेते नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रमेश गवळी, मनोज नरोडे, धनंजय कहार, राहुल देवळालीकर, संदीप कपिले यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची भेट घेऊन या प्रमुख रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून या रस्त्याच्या कामासाठी ३० लाखाचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले आहे.  

Mypage

कोपरगाव शहराच्या प्रभाग क्रमांक ०३ मधील पुनम थिएटर परिसर ते बस स्टॅन्ड रस्ता तसेच अशा रेस्टॉरंट ते जुना कोठारी दवाखाना व व्यापारी धर्मशाळा समोरील रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत होता. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची भेट घेऊन वरील रस्त्यांच्या कामाचे तातडीने सुरुवात करावी अशी मागणी घेतली होती. त्या मागणीची दखल घेऊन कोपरगाव नगरपरिषदेने पूनम थिएटर परिसर ते मेन रोड (बस स्टॅन्ड मार्ग) रस्ता, आशा रेस्टॉरंट ते जुना कोठारी दवाखाना व व्यापारी धर्मशाळा समोर रस्ता या तीनही रस्त्यांच्या नूतनीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

Mypage

या तीनही रस्त्यासाठी प्रत्येकी ०९ लाख ९८ हजार ५५९ मात्र अंदाजीत निधी गृहीत धरून एकूण २९ लाख ९५ हजार ६७७  रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केले आहे.  सार्वजनिक विभागाकडून लवकरच या तीनही रस्त्यांच्या कामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळून या रस्त्यांचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ०३ मधील नागरिकांना येत असलेल्या अडचणी व होणारा त्रास दूर होणार आहे. त्याबद्दल सर्व नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे व कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *