लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांची जयंती साजरी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंढे  यांची जयंती शेवगाव शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच यावेळी अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांचे संपर्क कार्यालयात मुंढे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात येऊन राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने संत धुंडा महाराज वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे व खाऊचे वाटप करण्यात आले.

       भाजपाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे,  सरचिटणीस भीमराज सागडे, अशोकराव अहुजा, सुनील रासने,   रवींद्र सुरवसे , नगरसेवक गणेश कोरडे, महेश फलके, युवा मोर्चाचे अमोल काळे, प्रा. नितीन मालानी, कैलास सोनवणे, संतोष कंगनकर, ज्ञानेश्वर खांबट, शुभम काथवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

    मुंढे चौकातील  स्व.गोपिनाथराव मुंढे यांच्या पुतळ्यास भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी  पुष्पहार घालून अभिवादन केले.  त्यानंतर लहान मुलांना फळे वाटण्यात आली. तसेच पंकाजाताईनी  ऑनलाइन पद्धतीने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. डॉ. नीरज लांडे, कुष्णा देहडराय, सालार भाई शेख, उमेश धस, शिवसेना तालुकाप्रमुख (शिंदे गट) आशुतोष डहाळे आदि उपस्थित होते.