शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे पार पडलेल्या डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रक्षेपण शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी येथील आखेगाव रस्त्यावरील स्वराज्य मंगल कार्यालयात करण्यात आले.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ क्षितिज घुले यांचे सह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत विक्री करनिरिक्षक पदी किरण निळ, तर खाते अंतर्गत पोलीस उपनिरिक्षक निवड झालेल्या सचिन फुंदे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जि. प. कृषी समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे पाटील,काकासाहेब नरवडे, माजी सभापती अरुण पाटील लांडे, कल्याण नेमाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, संजय फडके, पंडितराव भोसले, ताहेर पटेल, कमलेश लांडगे यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.