कोपरगावच्या मध्यवर्ती भागात पुन्हा बिबट्याचा वावर 

Mypage

नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी दि.१६ : कोपरगाव शहरात बिबट्याचा वावर नित्याचा झालाय. गजबजलेल्या कोपरगाव शहरात खुलेआम बिबट्या वावरत असल्याने नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे शहरातील नागरिक दहशतीच्या वातावरणात वावरत आहेत. शहरातील विविध भागात बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे. काल पहाटे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बैलबाजार भागात बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Mypage

वन विभागाच्या वतीने बसस्थानक परिसरातील काटवणाच्या बाजूला जाळी लावण्यात आली असून बिबट्यास पकडण्यासाठी रात्री उशिरा पिंजरा देखील लावण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी सांगितले. या सर्व प्रकारात नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.

Mypage

अचानक बिबट्या समोर आला तर नागरिकांनी काय करावयाचे याबाबत सर्व सामान्यांना कुठलीही माहिती नाही. बिबट्या व त्याबाबतचे कायदे काय? हे ठाऊकच नाही. त्यामुळे वन विभागाने नागरीकानाम्ध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. आज पहाटे शहरात बिबट्याचा वावर असल्याचे व्हिडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. 

Mypage

ग्रामीण भागात राहणारे बिबटयांना खाण्यास भक्ष मिळत नसल्याने त्यांनी थेट शहरी भागात प्रवेश करून दहशत निर्माण केली आहे. गेल्या तीन महिण्यापूर्वी इंदिरापथ व परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली होती. अगदी नागरिकांच्या घर, चारचाकी वाहनांवर बिबट्याने उद्या मारल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावेळी अनेक जण सतर्क झाले. त्यावेळी सदर भागात रात्री संचारबंदीसारखे वातावरण निर्माण झाले होते. पहाटे फिरायला जाणारे व सकाळी शिकवणीसाठी जाणाऱ्या विद्यार्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.

Mypage

आता पुन्हा एकदा शहरातील मध्यवर्ती भागात बिबट्या दिसून आल्याने अनेकांची धावपळ झाली. परिसरातील नागरिकांनी आधी पोलीस ठाण्यात व नंतर वन विभागाला कळवले आहे. सदर बिबट्या बस स्थानाकामागील बाजूस मोठे काटवनात लपला असल्याचे वन अधिकारी सांगत आहे. वन विभागाच्या वतीने सदर काटवन भागात जाळी लावण्यात आली असून बिबट्यालाला पकडण्याचा प्रयत्न केला जात होता.

Mypage

दरम्यान शहरात बिबट्या दिसणे हे जवळपास दरमहा होत आहे. अनेकदा दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान शहरातील शंकर नगर, कर्मवीर नगर, भगवती कॉलनी, दुल्हनवस्ती, ब्रिजलाल नगर, खडकी, समतानगरसह शेती भाग शेजारी असलेल्या भागात बिबट्याचा वावर अधिक वाढत असल्याने नागरिक चिंतेत आहेत.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *