शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगाव रोटरी क्लब व प्रांजल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीच्या लेकी या उपक्रमांतर्गत शेवंगाव तालुक्यातील हुशार व गरजू विद्यार्थिनींसाठी पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयात सायकल बँक हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
तालुक्यातून लांब अंतरावरून विद्यालयात येणाऱ्या हुशार व गरजु विद्यार्थिनींना त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एकूण नऊ विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. त्यामध्ये समिक्षा भारत बोरुडे अमरापूर, भाग्यश्री संजय केदार मंगरूळ, स्नेहल अशोक दिवटे आव्हाणे, साक्षी अशोक पठाडे आव्हाणे, अक्षदा प्रकाश मगर तळणी, मयुरी सावता पुंड दादेगाव, दिपाली भाऊसाहेब नरके गहिलेवस्ती, शेख झरीन अकिल सोनेमिया वस्ती, काजल मगर लांडेवस्ती या विध्यार्थीनींना सायकली देण्यात आल्या. यावेळी प्रांजल फाउंडेशनचे, कल्याण येथील आरटीओ प्रशांत देवणे यांनी आपल्या मुलीच्या स्मरणार्थ दिलेल्या सायकली विद्यार्थिनींचे भविष्य उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर आशिष लाहोटी होते. सायकल बँकचे प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब चौधरी, सचिव डॉ. मयूर लांडे, सहसचिव प्रदीप बोरुडे, डॉ संजय लड्डा, डॉ.मनीषा लढ्ढा, डॉ. प्रतीक्षा बेडके, डॉ. गणेश चेके, प्रा.किसनराव माने, मनीष बाहेती, संतोष ढाकणे, डॉ. पुरुषोत्तम बिहाणी, डॉ. भागनाथ काटे, काकासाहेब लांडे, आण्णासाहेब दिघे, डॉ. सुयोग बाहेती, वल्लभशेठ लोहिया, प्रवीण लाहोटी, प्रांजल फाउंडेशनचे मधुकर काका देवणे, भारतीय शिक्षण मंडळाचे सहसचिव हरीष भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे, काटेकर ‘ विद्यार्थिनींचे पालक, मार्गदर्शक शिक्षक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले तर डॉक्टर लांडे यांनी आभार मानले.