जनता इंग्लिश स्कूल मध्ये वृक्ष दिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०५ : तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय हरित सेना, योजनेअंतर्गत वृक्ष दिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संवत्सर येथील श्रृंगेश्वर भजनी मंडळाने प्रमुख उपस्थिती दर्शवत वृक्षदिंडी उपक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. याप्रसंगी उद्घाटन सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध भजनी मंडळाचे सदस्य नामदेव बाबा पावडे यांनी भूषवले, व त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षाचे उपयोग व मानवी जीवनाचे महत्त्व सांगितले. 

प्रमुख पाहुण्यांमध्ये पंडित भारुड यांनी वृक्षसंवर्धन, काळाची गरज या संदर्भात मार्गदर्शन केले. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे स्पष्टीकरण देऊन “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्ष संवर्धनाचे महत्व सांगितले. याप्रसंगी वृक्षदिंडी निमित्ताने वृक्षपालखीचे नियोजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी संवत्सर येथील भजनी मंडळाचे सदस्य बाबासाहेब खर्डे, राजेंद्र कापसे, राजेंद्र भोकरे, बाळासाहेब सोनवणे, शिवाजी घेर, प्रभाकर कर्पे, निवृत्ती दैंने, सुभाष बिडवे, भीमा गायकवाड आदींनी वृक्ष दिंडीमध्ये सहभाग नोंदविला. सर्व भजनी मंडळ सदस्यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे आर.एस यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक विद्यालयाचे पर्यवेक्षक अंबिलवादे एस.आर. यांनी केले. यासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख दवंगे सी. के. व सहाय्यक गायकवाड बी. के यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक भोये, बनसोडे, दाणे, वाघमारे विद्यालयाचे लेखनिक ढोले, शिंदे, बागुल व सर्व सेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल विभाग प्रमुख खताडे जे.व्ही. यांनी केले व आभार वाघमारे यांनी मांडले. अशा प्रकारे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थी पालक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक बंधू भगिनी यांचा सहभाग लक्षणीय होता.